IIT-IIM मधून शिक्षण, एका झटक्यात लाखोंची नोकरी सोडली; अंगावर भगवी वस्त्रं धारण करून…

स्वामी मुकुंदानंद यांचा जीवन प्रवास हा आयआयटी आणि आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून उच्च शिक्षण घेतल्यावर लाखो रुपयांची कॉर्पोरेट नोकरी सोडून संन्यास स्वीकारण्याचा एक प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांचा लहानपणीचा आध्यात्माकडे असलेला कल आणि नंतर कॉर्पोरेट जीवनातील असंतोष यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. आता ते आध्यात्मिक गुरु म्हणून जगभर सेवा देत आहेत.

IIT-IIM मधून शिक्षण, एका झटक्यात लाखोंची नोकरी सोडली; अंगावर भगवी वस्त्रं धारण करून...
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 9:28 PM

माणसाच्या आयुष्यात कधी विरक्ती येईल याचा नेम नाही. कोण कधी अध्यात्माच्या मार्गाला लागेल याचाही भरवसा नाही. काही लोक तर आयुष्याच्या एका टप्प्यावर संन्यास घेऊन धर्मकार्यात झोकून देतात. काही तर आयुष्याचा सुवर्णकाळ सुरू होत असतानाच अंगावर भगवी वस्त्र घेऊन संन्यास घेत असतात. अमूक तरुणाने संन्यास घेतला, तमूक तरुणीने संन्यास घेतला अशा बातम्या नेहमीच ऐकायला येत असतात. यात अनेकजण तर चांगले शिकलेले असतात. स्वामी मुकुंदानंद हे त्यापैकीच एक. आयआयटी आणि आयआयएममधून शिकलेल्या स्वामी मुकुंदानंद यांनी लाखो रुपयांची कार्पोरेटची नोकरी सोडली अन् अचानक अंगावर भगवी वस्त्रे धारण केली. काय घडलं त्यांच्या आयुष्यात असं?

स्वामी मुकुंदानंद यांचा प्रवास इंजिनिअर ते संन्यासी असा राहिला आहे. मुकुंदानंद यांचा जन्म 19 डिसेंबर 1960 रोजी झाला. इतर सामान्य तरुणांप्रमाणे त्यांनी इयत्ता 10 आणि 12 वीतून चांगले मार्क्स मिळवले. त्यानंतर, आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT) दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला. आयआयटीतून त्यांनी बीटेकची डिग्री घेतली. मुकुंदानंद इथेच थांबले नाहीत. आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात मास्टर डिग्री मिळवण्यासाठी भारतीय प्रबंध संस्थान (IIM) कोलकातामध्ये प्रवेश घेतला. इथून त्यांनी एमबीए पूर्ण केलं.

कॉर्पोरेट नोकरी

आयआयटी आणि आयआयएम सारख्या संस्थांमधून शिक्षण घेतल्यानंतर मुकुंदानंद यांना लवकरच एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्यांनी ही नोकरी स्वीकारली आणि बराच काळ ते कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत राहिले. पण त्यांचा मन काही नोकरीत लागलं नाही. मन काही और सांगत होतं.

हे सुद्धा वाचा

अखेर तो क्षण आलाच

मुकुंदानंद यांचं कॉर्पोरेट नोकरीत मन लागले नाही. खरंतर, लहानपणापासून त्यांचा धर्म आणि आध्यात्माकडे कल होता. पण इतर तरुणांप्रमाणे तेही बाह्य दुनियेकडे आकर्षित झाले होते. काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केल्यानंतर त्यांना समजलं की, ते जसं जीवन जगू इच्छित होते, तसं ते नाही जगू शकत. म्हणूनच त्यांनी एका झटक्यात नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि संन्यासी होण्याचा मार्ग स्वीकारला. यानंतर त्यांनी संपूर्ण भारत पालथी घातला आणि नंतर जगद्गुरु श्री कृपालुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक प्रशिक्षण घेतलं.

शिष्य घडवण्याचं काम

लाखो रुपयांची नोकरी सोडल्यानंतर आता स्वामी मुकुंदानंद आध्यात्मिक गुरु म्हणून देश-विदेशात लोकांना आध्यात्मिक ज्ञान देतात. याशिवाय, ते योग आणि ध्यानाचे प्रशिक्षण देखील देतात. त्यांनी “जगद्गुरु कृपालुजी योग” (JKYog) संस्था स्थापन केली आहे. त्याचप्रमाणे, ते जगद्गुरु कृपालु विश्वविद्यालयाचे संस्थापक आहेत. स्वामी मुकुंदानंद यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.