IIT च्या ‘या’ विद्यार्थ्याची अवघ्या 15 महिन्यांत 5000 कोटींची कमाई, पराक्रम पाहून भलेभले आश्चर्यचकित

अवघ्या 15 महिन्यांत त्यांनी कॉईनबेसमध्ये सुमारे 180.8 मिलियन डॉलर्सची कमाई केली. भारतीय रुपयांमधील ही रक्कम सुमारे 1,500 कोटी रुपयांच्या घरात आहे. IIT student surojit chatterjee

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:20 PM, 15 Apr 2021
IIT च्या 'या' विद्यार्थ्याची अवघ्या 15 महिन्यांत 5000 कोटींची कमाई, पराक्रम पाहून भलेभले आश्चर्यचकित
IIT student surojit chatterjee

नवी दिल्लीः आयआयटीचा माजी विद्यार्थी अवघ्या 15 महिन्यांत सुमारे 5000 कोटी रुपयांचा मालक झालाय. फ्लिपकार्ट आणि गुगल यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेल्या या व्यक्तीचे नाव सुरोजित चॅटर्जी (surojit chatterjee) आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांनी अमेरिकेच्या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कॉईनबेसमध्ये मुख्य उत्पादन व्यवस्थापक म्हणून कामास सुरुवात केली. अवघ्या 15 महिन्यांत त्यांनी कॉईनबेसमध्ये सुमारे 180.8 मिलियन डॉलर्सची कमाई केली. भारतीय रुपयांमधील ही रक्कम सुमारे 1,500 कोटी रुपयांच्या घरात आहे. (IIT student surojit chatterjee earns Rs 5,000 crore in just 15 months)

सुरोजितच्या कमाईचा नवा उच्चांक

बुधवारी कॉईनबेस एक्सचेंजमध्ये चांगला व्यापार झाल्यानंतर सुरोजितच्या कमाईनं नवा उच्चांक गाठला. खास बाब म्हणजे पुढील 5 वर्षांत त्यांना शेअरचा पर्यायही मिळणार आहे. सध्या कॉईनबेस समभागांची किंमत सुमारे 465.5 मिलियन डॉलर किंवा 3,500 कोटी रुपये आहे.

आयआयटी खडगपूरमधून गिरवले शिक्षणाचे धडे

सुरोजित चॅटर्जी यांनी आयआयटी खडगपूर येथून बीएससी केले. नॅस्डॅकपासून सुरुवात केल्यानंतर कॉईनबेसचे संस्थापक ब्रायन आर्मस्ट्रॉंग आणि फ्रेड एहर्शियम यांच्यासमवेत सुरोजित चॅटर्जी यांनी बरेच काही मिळवले. या तिघांचा वाटा आता एकूण 16 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलाय. हे ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये याची माहिती देण्यात आलीय.

लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये वाढ झाल्यानं कमाई वाढली

नॅस्डॅकवर कॉईनबेसचे शेअर्स 100 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासह प्रति शेअर 381 डॉलरच्या दराने सुरू झाले. त्यानंतर तो प्रति शेअर 430 डॉलरपर्यंत वाढला होता. नंतर तो 328.28 डॉलरवर बंद झाला. बिटकॉईनबरोबरच ही कंपनी देखील सार्वजनिक झालीय. कंपनीच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये बिटकॉईन आणि इथेरियमचा सर्वाधिक वाटा आहे. या दोन्ही क्रिप्टोकरन्सी आतापर्यंतच्या उच्च स्तरावर व्यापार करीत आहेत. यंदा बिटकॉईनची किंमत जवळपास दुप्पट होऊन 64,000 डॉलरच्या पार गेलीय.

मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंक येथे तीन वर्षे काम केल्यावर चॅटर्जी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कॉईनबेसमध्ये दाखल झाले. गुगलवर ते कंपनीच्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर काम करायचे. यापूर्वी त्यांनी मोबाईल शोध जाहिराती आणि अ‍ॅडसेन्सचे उत्पादन आणि वितरण कार्यसंघासाठी काम केले होते. त्यांना फ्लिपकार्टमध्ये काम करण्याचा अनुभवही आहे.

अमेरिकेबाहेरील लोक क्रॉस बॉर्डर ट्रॅन्झॅक्शनसाठी मदतगार ठरू शकतात

कॉईनबेसचे सह-संस्थापक आर्मस्ट्राँग यांनी गेल्या वर्षी सुरोजितला नोकरीवर घेतल्यानंतर कंपनीच्या ब्लॉगपोस्टवर लिहिले आहे की, ‘जर कोणी व्यक्त फक्त अमेरिकेतच राहिली असेल, काम केले असेल आणि व्यवहार केला असेल तर अशा लोकांसाठी क्रॉस बॉर्डर ट्रॅन्झॅक्शन समजून घेताना मला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत केवळ अमेरिकेबाहेरील लोक क्रॉस बॉर्डर ट्रॅन्झॅक्शनसाठी मदतगार ठरू शकतात. ‘

संबंधित बातम्या

Gold-Silver Price Today : सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? आजचे दर जाणून घ्या

अदानी ग्रुपचं मोठं पाऊल, 48 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार!

IIT student surojit chatterjee earns Rs 5,000 crore in just 15 months