PNB खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 20 लाखांचा फायदा घेता येणार, जाणून घ्या कसा?

ग्राहक पीएनबी माय सॅलरी अकाऊंटमध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये ग्राहकांना वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण देखील मिळते. तुम्ही खात्यासोबत मोफत क्रेडिट कार्ड देखील घेऊ शकता. जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर तुम्ही या खात्यातून ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात कर्ज घेऊ शकता.

PNB खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 20 लाखांचा फायदा घेता येणार, जाणून घ्या कसा?
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 8:11 AM

नवी दिल्लीः जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेत खाते उघडले तर तुम्हाला पूर्ण 23 लाख रुपयांचा लाभ मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर बँकेत हे खाते लगेच उघडू शकता. पंजाब नॅशनल बँकेच्या या खात्याचे नाव पीएनबी माय सॅलरी अकाऊंट आहे. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आम्ही तुम्हाला या खात्याबद्दल तपशीलवार माहिती देणार आहोत. पीएनबीने ट्विटद्वारे या खात्याची माहिती दिलीय. ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘माय सॅलरी अकाऊंट’ उघडून ग्राहक त्यांचे फायदे अनेक पटींनी वाढवू शकतात. PNB नुसार, माय सॅलरी अकाऊंटमध्ये शून्य प्रारंभिक ठेव द्यावी लागेल. म्हणजेच खाते उघडताना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. या खात्यात ग्राहकांना स्वीप सुविधा मिळणार आहे.

ओव्हरड्राफ्टचे फायदे

ग्राहक पीएनबी माय सॅलरी अकाऊंटमध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये ग्राहकांना वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण देखील मिळते. तुम्ही खात्यासोबत मोफत क्रेडिट कार्ड देखील घेऊ शकता. जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर तुम्ही या खात्यातून ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात कर्ज घेऊ शकता. ओव्हरड्राफ्टमध्ये तुम्हाला खात्यातून जास्त पैसे काढण्याची सुविधा मिळेल.

या खात्यावर स्वीप सुविधेची सेवा देखील उपलब्ध

स्वीप सुविधा अतिशय खास आहे, ज्यामध्ये ग्राहकांना दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. पंजाब नॅशनल बँक प्रुडंट स्वीप डिपॉझिट योजना चालवते जी तुम्हाला तुमच्या बचतीवर उच्च व्याजदर मिळविण्यात मदत करते. या सुविधेत बचत खात्यातून मुदत ठेवीमध्ये पैसे स्वयंचलितपणे हस्तांतरित केले जातात.

जाणून घ्या 20 लाखांचा फायदा कसा मिळेल?

PNB आपल्या पगारदार खातेधारकांना विमा संरक्षणासह अनेक फायदे देत आहे. शून्य शिल्लक आणि शून्य त्रैमासिक सरासरी शिल्लक सुविधेसह PNB MySalary खाते उघडल्यानंतर ग्राहकाला 20 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात संरक्षण दिले जाते.

4 प्रकारचे पगार खाते

या खात्यात दरमहा 10 हजार ते 25 हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांना सिल्व्हर कॅटेगरीत ठेवण्यात आलेय. याशिवाय 2500 ते 75000 रुपयांपर्यंतचे लोक सोने श्रेणीत ठेवण्यात आलेत. 75001 ते 150000 रुपये प्रीमियम श्रेणीत ठेवलेत त्याच वेळी 150001 रुपयांपेक्षा जास्त वेतन असलेल्यांना प्लॅटिनम श्रेणीत ठेवण्यात आले.

3 लाखांचा नफा कसा मिळवायचा?

पीएनबी माय सॅलरी अकाऊंटमध्ये बँकेकडून ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते. सिल्व्हर श्रेणीतील लोकांना 50,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. याशिवाय गोल्डसाठी 150000, प्रीमियमसाठी 225000 आणि प्लॅटिनमसाठी 300000 मध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.pnbindia.in/salary- Saving-products.html या लिंकला भेट देऊ शकता.

संबंधित बातम्या

युनियन बँक ऑफ इंडियाचा नफा तिप्पट वाढला, उत्पन्नातही फायदा

बँक ऑफ इंडियाचा धमाका, दुसऱ्या तिमाहीत नफ्यात 100% वाढ, NPA घटला

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.