नवी दिल्लीः कोरोनाच्या या जीवघेण्या काळात (Coronavirus Crisis) प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) वेळीवेळी करदात्यांना (Taxpayers) कर परतावा दिलाय. आता 1 एप्रिल 2020 ते 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत करदात्यांना 1,95,736 कोटी रुपयांचा कर परतावा दिल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) दिली आहे. तसेच ई-मेलद्वारे करदात्यांना सूचनाही केल्यात. जेणेकरून करदात्यांना प्रत्येक महत्त्वाचा मेसेज मिळावा. (Income Tax Department Announces Crores Of Tax Refunds To 1.93 Crore Taxpayers; Check Now)
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) 1 एप्रिल 2020 ते 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत 1.93 कोटी करदात्यांना 1,95,736 कोटी कर परतावा दिलाय. यामध्ये 1,90,52,977 प्रकरणांमध्ये 69,653 कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर परतावा दिला गेला. इतकंच नव्हे तर 2,17,399 प्रकरणांमध्ये 1,26,083 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावाही देण्यात आला आहे.
CBDT issues refunds of over Rs. 1,95,736 crore to more than 1.93 crore taxpayers between 1st April,2020 to 22nd February,2021. Income tax refunds of Rs. 69,653 crore have been issued in 1,90,52,977cases &corporate tax refunds of Rs. 1,26,083crore have been issued in 2,17,399cases
— Income Tax India (@IncomeTaxIndia) February 24, 2021
पीएफच्या नव्या नियमानुसार, वर्षाला 2.5 लाखांपर्यंत जमा असलेल्या योगदानावर कोणताही कर आकारला जाणार नाही. परंतु पीएफ खात्यात 2.5 लाखांहून अधिक रक्कम जमा असल्यास त्यावर कर आकारला जाणार आहे. पण नेमका कर किती आकारला जाणार हे अद्यापही अस्पष्ट आहे. सध्याच्या नियमानुसार कंपनी आणि आपल्या पगारातून जवळपास 12 टक्के पैसे पीएफ खात्यात जमा केले जातात. सध्या यावर कुठलाही कर लागत नाही. परंतु नव्या नियमानुसार, उच्च उत्पन्न असणाऱ्यांना हा कर भरावा लागणार आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना या नियमाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
उच्च उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानावर कर आकारला जाणार आहे. त्यानुसार पीएफ खात्यात 2.5 लाखांहून अधिक रक्कम जमा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या व्याजावरील करसूट रोखण्यात येणार आहे. विशेष म्हणजे उच्च उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय जे कर्मचारी ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीत (vpf) गुंतवणूक करतात, त्यांना या नियमाचा फटका सहन करावा लागणार आहे. कारण त्यांना अधिकच्या रकमेसाठी कोणतीही करसूट मिळणार नाही.
दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात फसवणूकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामुळे अनेक लोक ई-मेल मिळाल्यानंतरही त्यावर उत्तर देत नाही आहेत. यासाठी आयकर विभागाकडून काही अधिकृत ई-मेलची यादी जारी करण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला खरंच आयकर विभागाचा मेल आला आहे की फसवणुकीचा आहे हे शोधणं सोपं जाईल. यासाठी आयकर विभागाने खालीलप्रमाणे अधिकृत ई-मेल आयडीची यादी जाहीर केली आहे.
– @incometax.gov.in
– @incometaxindiaefiling.gov.in
– @tdscpc.gov.in
– @cpc.gov.in
– @insight.gov.in
– @nsdl.co.in
– @utiitsl.com
संबंधित बातम्या
पीएफचा नवा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार; नोकरदारांवर परिणाम काय?