2019 मध्ये भारत चीनलाही मागे टाकणार : वर्ल्ड बँक

मुंबई : 2018-19 या आर्थिक वर्षात भारत जगातील सर्वात वेगाने विकसित हेणारी अर्थव्यवस्था ठरेल, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये जागतिक बँकेने सांगितले की, चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 7.3 टक्क्यांच्या वेगाने वाढेल. याच्या तुलनेत चीनचा विकासदर 6.3 टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता आहे. ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स : डार्कनिंग स्काईज’ या …

2019 मध्ये भारत चीनलाही मागे टाकणार : वर्ल्ड बँक

मुंबई : 2018-19 या आर्थिक वर्षात भारत जगातील सर्वात वेगाने विकसित हेणारी अर्थव्यवस्था ठरेल, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये जागतिक बँकेने सांगितले की, चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 7.3 टक्क्यांच्या वेगाने वाढेल. याच्या तुलनेत चीनचा विकासदर 6.3 टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स : डार्कनिंग स्काईज’ या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, या आर्थिक वर्षात जगातील बहुतेक अर्थव्यवस्थांचा वेग कमी असेल. पण भारत आणि दक्षिण आशिया क्षेत्रात हे चित्र वेगळं असेल.

“भारतात लागू झालेल्या जीएसटी आणि नोटाबंदीमुळे अनौपचारिक क्षेत्रांना औपचारिक क्षेत्रात परिर्वतीत होण्यास प्रोत्साहन मिळाले आहे”, असे मोदी सरकारच्या जीडीपी कर लागू करण्याच्या निर्णयावर जागतिक बँकेच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं.

जागततिक बँकेनुसार, भारताचा विकासदर 2018-19 मध्ये 7.3 टक्क्यांनी वाढेल. हा पुढील दोन आर्थिक वर्षात 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. वाढलेली मागणी आणि गुंतवणूक यांमुळे देशाचा जीडीपी 7.3 टक्क्यांवर पोहोचला, असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

2017 मध्ये जीएसटी आणि नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था कोलमडली होती. 2017 साली चीनचा विकासदर 6.9 टक्के होता, तर भारताचा विकासदर 6.7 टक्के होता, असे जागतिक बँकेच्या रिपोर्टमध्ये सांगितले गेले. जागतिक बँक प्रॉस्पेक्ट्स समुहाचे संचालक अहान कोसे यांनी सांगितले की, ‘भारताचा ग्रोथ आउटलुक आजही मजबूत आहे. भारत आजही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी मोठी अर्थव्यवस्था आहे.’

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *