‘या’ बँकेचं ग्राहकांना गिफ्ट; MCLR मध्ये कपात, गृह आणि वाहन कर्जे स्वस्त होणार

या कपातीमुळे इंडसइंड बँकेच्या EMI शी संबंधित गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज कमी होणार आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार, नवीन दर 22 फेब्रुवारी 2021 पासून लागू आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:15 PM, 22 Feb 2021
'या' बँकेचं ग्राहकांना गिफ्ट; MCLR मध्ये कपात, गृह आणि वाहन कर्जे स्वस्त होणार
IndusInd Bank

नवी दिल्लीः खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने (IndusInd Bank) ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ लेन्डिंग रेट’ (MCLR) मध्ये 0.05 टक्क्यांची कपात केलीय. ही कपात एमसीएलआरवर एका वर्षापासून केली जात आहे. आता इंडसइंड बँकेच्या एका वर्षाचा एमसीएलआरचा दर 8.65 टक्क्यांवरून 8.60 टक्के करण्यात आलाय. या कपातीमुळे इंडसइंड बँकेच्या EMI शी संबंधित गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज कमी होणार आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार, नवीन दर 22 फेब्रुवारी 2021 पासून लागू आहेत. (Indusind Bank Cuts Mclr Rate Home Auto And Personal Loan Emi Lower)

MCLR एका महिन्यासाठी 8.30 टक्के

इंडसइंड बँकेच्या म्हणण्यानुसार, MCLR एका दिवसासाठी 8.25 टक्के आणि एका महिन्यासाठी 8.30 टक्के करण्यात आलाय. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 8.35 टक्के, 6 महिन्यांच्या कालावधीसाठी 8.50 टक्के आहे. एक वर्षाचा एमसीएलआर आता 8.60 टक्के होईल. बहुतेक ग्राहक कर्ज यांच्याशी जोडलेले आहेत. त्याचबरोबर तीन वर्षांचा एमसीएलआर आता 8.95 टक्के होईल.

MCLR Benchmark MCLR (%)

एक दिवस – 8.25%
1 महिना – 8.30%
3 महिने – 8.35%
6 महिने – 8.50%
1 वर्ष – 8.60%
2 वर्षे- 8.90%
3 वर्षे- 8.95%

एचडीएफसी बँक आणि कॅनरा बँकेनंही दर घटवले

या महिन्यात खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक आणि सरकारी बँक असलेल्या कॅनरा बँकेने त्यांचे एमसीएलआर कमी केलेत. एक दिवस आणि एका महिन्याच्या कालावधीत कॅनरा बँकेने एमसीएलआरमध्ये 0.1 टक्क्यांनी कपात केली. Indusind Bank Cuts Mclr Rate Home Auto And Personal Loan Emi Lower

एमसीएलआर म्हणजे काय?

बँकांचा एमसीएलआरनुसारच त्याच्या फंडाची किंमत ठरते, जी दरमहा बँका जाहीर करतात. चालू खाते आणि बचत खात्यातील ठेवींमुळे मोठ्या बँकांमध्ये लहान बँकांपेक्षा कमी एमसीएलआर आहेत. एमसीएलआरला अंतर्गत बेंचमार्क मानले जाते, कारण बँकेची स्वत: ची कमी किमतीत निधी उभारण्याची क्षमता एमसीएलआरमध्ये महत्त्वाची बाब आहे. कोणतीही बँक एमसीएलआरवर कर्ज देते. परंतु बँक यापेक्षा कमी कर्ज देऊ शकत नाही. गृह कर्जाचे व्याज दर एकतर एमसीएलआरच्या तुलनेत किंवा त्यापेक्षा जास्त असतील.

संबंधित बातम्या

FD Rates In India: 2 कोटींपेक्षा कमी FD: SBI, PNB सह 5 मोठ्या बँकांमध्ये व्याजदर काय?

वर्षभरात फक्त 100 रुपये गुंतवून जीवनभराचं विमा सुरक्षा कवच, LIC ची जबरदस्त पॉलिसी

Indusind Bank Cuts Mclr Rate Home Auto And Personal Loan Emi Lower