पगाराला हात न लावता गुंतवणुकीचा सोपा आणि भन्नाट मार्ग, जबरदस्त फायदा शक्य

पगारदार व्यक्तीसुद्धा यशस्वीरीत्या गुंतवणूक करू शकतो, तसेच तो गुंतवणुकीतून जास्त पैसेसुद्धा कमावू शकतो.

पगाराला हात न लावता गुंतवणुकीचा सोपा आणि भन्नाट मार्ग, जबरदस्त फायदा शक्य

मुंबईः नोकरदार व्यक्ती बऱ्याचदा बचतीचे नवनवे मार्ग शोधत असतात. भविष्यातील बचत करण्यासाठी आतापासून गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं. पगारदार व्यक्तीसुद्धा यशस्वीरीत्या गुंतवणूक करू शकतो, तसेच तो गुंतवणुकीतून जास्त पैसेसुद्धा कमावू शकतो. (Investment Tips Salaried Class Employee In Sip Mutual Fund And Share Market)

गुंतवणूकदारांसाठी व्याज हे नेहमीच महत्त्वाचे असते. कारण गुंतवलेल्या पैशातून मिळणाऱ्या व्याजातून चांगला परतावा मिळतो. परंतु व्याज फक्त तेव्हाच मिळेल, जेव्हा गुंतवणूक मोठी असेल. त्यामुळे थोडी थोडी का होईना गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. नोकरदारांना पगारातून खर्चाचं गणित जुळवून गुंतवणूक करणं थोडंसं अवघड असतं. पगारातील ठरावीक रक्कम बाजूला काढून ती गुंतवल्यास आपल्याला चांगला फायदा मिळवून देते.

उदाहरणार्थ, 25 हजार रुपयांच्या पगाराच्या व्यक्तीला दरमहा 10 हजार रुपये वाचवणे अवघड आहे, परंतु ते दरमहा खर्च कमी करून 10 टक्के रक्कम वाचवू शकतात, म्हणजे दरमहा 2500 रुपयांची बचत करू शकतात.

तसेच आपण जमवलेल्या रकमेच्या गुंतवणुकीसाठी एक उत्तम योजना निवडण्याचीही आवश्यकता असते. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणं हे नेहमीच फायद्याचं समजलं गेलं आहे. प्रत्येक महिन्याला म्युच्युअल फंडामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मार्फत हा थोडा थोडा पैसा गुंतविला जाऊ शकतो, जिथून आपल्याला अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. दरमहा SIP मध्ये 2500 रुपये गुंतवल्यास पाच वर्षांनंतर ही रक्कमही 15 टक्के परताव्यानुसार सुमारे 2 लाख रुपये होते. दरम्यान, दरवर्षी गुंतवणूकदाराचा पगारही वाढणार असतो. अशा परिस्थितीत पाच वर्षांनंतर गुंतवणूकदाराकडे एक लाख रुपयांची मुबलक रक्कम असते. जर गुंतवणूकदारांनी पुढील तीन वर्षांत निधीमध्ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवले, तर 8 वर्षांनंतर जमा झालेली रक्कम 4 लाख रुपयांवर जाईल.

साधारणत: नोकरदारांचे वेतन जवळपास 8 वर्षांत दुप्पट होत असते. जर त्यांचा पगार वार्षिक 10% ने वाढला असेल तर, त्या आधारावर दरमहा 25 हजार रुपये पगार 10 वर्षांत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त होतो. त्याच काळात अवघ्या अडीच हजार रुपयांची गुंतवणूक याच कालावधीत वाढून 6 लाख रुपयांपर्यंत जाते. एवढेच नाही तर 10 वर्षांत गुंतवणूकदार पगाराच्या वाढीतून बचत केलेली रक्कम इतर ठिकाणी गुंतवू शकतात. जसे की, स्टॉक मार्केट, पीपीएफ आणि शॉर्ट टर्म फंड. या व्यतिरिक्त जर गुंतवणूकदारांनी 20 वर्षांपर्यंत म्युच्युअल फंडासह इतर ठिकाणी गुंतवणूक सुरू ठेवली तर ती रक्कम इतकी मोठी होईल की त्यांना पगाराच्या समान गुंतवणुकीतून पैसे मिळू लागतील.

(कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी Good News; महागाई भत्ता लवकरच वाढण्याची शक्यता

Bank of Baroda मध्ये नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *