आठवड्याभरात गुंतवणूकदारांना 1.13 लाख कोटींचा फायदा; TCS रिलायन्सपासून 15 हजार कोटींनी मागे

टीसीएस रिलायन्सपेक्षा फक्त 15 हजार कोटी रुपयांनी मागे आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:48 PM, 17 Jan 2021
आठवड्याभरात गुंतवणूकदारांना 1.13 लाख कोटींचा फायदा; TCS रिलायन्सपासून 15 हजार कोटींनी मागे
Nifty Sensex today

नवी दिल्लीः सेन्सेक्सच्या पहिल्या दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार मूल्य (मार्केट कॅप) गेल्या आठवड्यात 1,13,018.94 कोटी रुपयांनी वाढले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि भारती एअरटेल यांना सर्वाधिक फायदा झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक यांचे बाजार मूल्यही वाढले. रिलायन्स अजूनही बाजार मूल्याच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. पण टीसीएस फक्त 15 हजार कोटी रुपयांनी मागे आहे. (Investors Wealth Rose By 1.13 Lakh Crore This Week TCS Trailing Reliance)

या आठवड्यात हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्सच्या बाजार मूल्यात घट झाली असून, टीसीएसचे बाजार भांडवल आठवड्यात 42,495.76 कोटी रुपयांनी वाढून 12,13,371.12 कोटी रुपयांवर गेले. भारती एअरटेलचे बाजार मूल्य 33,960.84 कोटी रुपयांनी वाढून 3,28,697.33 कोटी रुपये झाले. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 19,001.41 कोटी रुपयांनी वाढून 8,07,615.27 कोटी आणि इन्फोसिस बाजारमूल्य 14,184.43 कोटी रुपयांनी वाढून 5,72,957.16 कोटी रुपयांवर गेले.

रिलायन्सची बाजारपेठ 12.28 लाख कोटी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 2,884.44 कोटी रुपयांनी वाढून 12,28,330.03 कोटी आणि आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य 492.06 कोटींनी वाढून 3,74,745.94 कोटींपर्यंत पोहोचलं होतं, कोटक महिंद्रा बँकेचे बाजार मूल्य 21,171.32 कोटी रुपयांनी घसरून 3,69,082.01 कोटी आणि बजाज फायनान्सचे बाजारमूल्य 12,000.53 कोटी रुपयांनी घसरून 2,94,156.02 कोटी रुपयांवर गेले.

HUL चे बाजार मूल्य 9034 कोटी रुपयांनी कमी

हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 9,034.04 कोटी रुपयांनी घसरून 5,52,592.14 कोटी आणि एचडीएफसीचे 3,861.42 कोटी रुपयांनी घसरून 4,73,801.61 कोटी रुपयांवर गेले. रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्सचा क्रमांक लागतो. मागील आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 252.16 अंक किंवा 0.51 टक्क्यांनी वधारला.

संबंधित बातम्या

Special Story | लसीकरणाची नांदी आणि अर्थव्यवस्थेची घसरगुंडी; सोन्यातील गुंतवणूक ठरणार का फायदेशीर?

Gold-Silver Price Today | मकरसंक्रांतीला सोन्याचे दर घसरले, तुमच्या शहरातील आजचे भाव जाणून घ्या

Investors Wealth Rose By 1.13 Lakh Crore This Week TCS Trailing Reliance