EPFO ने पीएफ व्याजाबाबत चांगली बातमी, एकाच वेळी खात्यावर मोठी रक्कम जमा

नोकरदारांसाठी पीएफ व्याजाबाबत चांगली बातमी आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून पीएफ धारक पीएफ व्याजाची वाट पाहत होते.

EPFO ने पीएफ व्याजाबाबत चांगली बातमी, एकाच वेळी खात्यावर मोठी रक्कम जमा
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 6:59 AM

मुंबई : नोकरदारांसाठी पीएफ व्याजाबाबत चांगली बातमी आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून पीएफ धारक पीएफ व्याजाची वाट पाहत होते. हे व्याज वेळोवेळी ईपीएफओकडून खात्यावर जमा होतं. या वर्षीचं व्याज जमा होणं बाकी होतं, मात्र लवकरच हे व्याजही खात्यात जमा होणार आहे. पीएफधारकांना खूप वाट पाहावी लागल्यानंतर ईपीएफओ पीएफ व्याजदराबाबत एक योजना आखून त्याची माहिती कर्मचाऱ्यांना दिलीय.

कधीपर्यंत पीएफ व्याजाचे पैसे मिळणार?

ईपीएफओकडून व्याज जमा झाल्यास जवळपास 6 कोटी ईपीएफओ ग्राहकांना याचा फायदा होईल. याआधी जुलै अखेर व्याज पीएफ खात्यात जमा होईल असं मानलं जात होतं. मात्र, तसं झालं नाही. ईपीएफओकडून 8.5 टक्के दराने ईपीएफ व्याज खात्यात जमा केले जाईल. याआधी दोन हप्त्यात व्याज जमा होईल असं सांगितलं गेलं होतं. त्यानुसार एक हप्ता जुलै अखेर आणि दुसरा डिसेंबरपर्यंत पाठवली जाईल असा अंदाज होता.

ईपीएफओकडून नेमकी काय घोषणा?

एका पीएफ खातेधारकाने ट्विटरवर ईपीएफओला टॅग करुन ईपीएफओकडून पीएफ व्याज दर कधीपर्यंत मिळेल असा प्रश्न विचारला होता. त्यावर ईपीएफओने प्रतिसाद देत सर्वांना एक रकमी व्याज मिळेल आणि ते पीएफ खात्यात जमा होईल अशी माहिती दिली. तसेच कुणाच्याही पीएफ व्याजाचं नुकसान होणार नाही, असा विश्वासही दिला. मात्र, व्याज पीएफ खात्यात कधी जमा होणार याची नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

7 वर्षातील निच्चांकी पीएफ व्याजदर

कोविड-19 साथीरोगानंतर ईपीएफओने मार्च 2020 मध्ये पीएफ व्याज दर आर्थिक वर्ष 2019-20 साठी 8.5 टक्के केले होते. हे ईपीएफ व्याज दर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी आहे. याआधी आर्थिक वर्ष 2018-19 साठी ईपीएफ व्याज दर 8.65 टक्के होतं. आर्थिक वर्ष 2017-18 साठी ईपीएफओ 8.55 टक्के व्याजदर देत होते.

हेही वाचा :

नोकरदारांना 7 लाखांचा मोफत विमा, जाणून घ्या काय आहे EPFO ची योजना

यंदा मोदी सरकारने प्रोव्हिडंट फंड निधीतील किती रक्कम शेअर बाजारात गुंतवली?

आजारपणाच्यावेळी खर्चासाठी PF खात्यातील पैसे काढण्याची मुभा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

व्हिडीओ पाहा :

Know about When EPFO will credit PF interest amount in your account for 2020-21

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.