Explainer : बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित, जाणून घ्या…

आरबीआयने सर्वसामान्यांना त्यांचे पैसे बँकेत सुरक्षित असल्याचंही आश्वासन वेळोवेळी दिलं. Know How Safe Your Money In Your Bank Account

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:35 PM, 4 Dec 2020
Bank Account HDFC BANK

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले. कोव्हिड 19 चा सर्वाधिक फटका बँकिंग क्षेत्राला बसला. वास्तविक बँकांची अवस्था आधीपासूनच वाईट होती. बँकांवरील एनपीएचा वाढता दबाव आणि कर्ज बुडव्यांमुळे बँका बुडीत निघाल्या. या कारणास्तव RBI ने गेल्या काही महिन्यांत मोठे निर्णय घेतले. त्यामुळे लोकांचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत का, यावर शंका उपस्थित होऊ लागली आहे. (Know How Safe Your Money In Your Bank Account)

पीएमसी घोटाळा असो किंवा येस बँक प्रकरण, यातून दोन्ही बँकांना वाचवत आरबीआयने सर्वसामान्यांना त्यांचे पैसे बँकेत सुरक्षित असल्याचंही आश्वासन दिलं. जेव्हा आरबीआयने एचडीएफसीसारख्या मोठ्या बँकांच्या डिजिटल हालचालींवर निर्बंध लादले, तेव्हा बँकिंग क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली. चला तर जाणून घेऊयात बँकेत आपले पैसे किती सुरक्षित आहेत.

आरबीआय, बँकिंग क्षेत्र आणि सरकार

सरकारने आणि आरबीआयने बँका वाचवण्यासाठी आणि ग्राहकांचे पैसे सुरक्षित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असं म्हणणं चुकीचं ठरेल. याची सर्वात मोठी उदाहरणे म्हणजे येस बँक आणि लक्ष्मी विलास बँक आहे. येस बँकेतील घोटाळा जेव्हा समोर आला, तेव्हा लोकांना वाटले की, आता त्यांचे पैसे बुडाले. पण त्याच वेळी आरबीआयनं समोर येऊन लोकांना त्यांचे बँकेतील पैसे सुरक्षित असल्याची खात्री पटवून दिली, तसेच बँकेला बुडण्यापासून वाचविले. काही दिवसांपूर्वी लक्ष्मी विलास बँकेच्या बाबतीतही असेच घडले. या बँकेचेही आरबीआयने दुसऱ्या बँकेत विलीनीकरण करून ग्राहकांचे पैसे सुरक्षित केले.

सरकारच्या विश्वासार्हतेवर परिणाम

कोणतीही बँक बुडीत निघाल्यास त्याचा थेट परिणाम सरकारच्या पतधोरणांवर होतो. त्यामुळे सरकार कधीही कोणतीही बँक बुडीत जाऊ देत नाही. येस बँक असो किंवा लक्ष्मी विलास बँक असो किंवा सहकारी बँकांमध्ये सुरू असलेला गोंधळ. आरबीआयने वेळोवेळी बँकिंग क्षेत्रात मोठे फेरबदल केले आहेत आणि बँकिंग क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढले आहे.

बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ काय म्हणतात…

बँकिंग तज्ज्ञ आणि बँकिंग संस्थापक आश्विनी राणा यांनी टीव्ही 9 भारतवर्षाला सांगितले की, आजवर सरकारने कोणत्याही बँकेला बुडण्याची परवानगी दिलेली नाही, असा इतिहास आहे. आरबीआयने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. जेणेकरून अशी परिस्थितीच उद्भवू नये, तसेच लोकांना त्यांच्या पैशाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता करावी लागू नये, असंसुद्धा राणा म्हणाल्या आहेत. Know How Safe Your Money In Your Bank Account

बँकिंग तज्ज्ञ सुनील बन्सल म्हणतात की, गेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्रात घडलेल्या घटनांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर झाला. येस बँक प्रकरण जेव्हा घडले, तेव्हा लोकांना विश्वास वाटू लागला की एवढ्या मोठ्या बँकेत पैसे सुरक्षित नसतील तर गावातील लहान बँकेत कुठे राहतील. अशा परिस्थितीत बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता येण्यासाठी नियमांत आणखी बदल करण्याची आवश्यकता आहे.

एचडीएफसी बँकेचे काय आहे प्रकरण?

रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला (HDFC BANK)आगामी डिजिटल व्यवसाय आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे तात्पुरते थांबवायला सांगितले. गेल्या महिन्यात एचडीएफसीच्या डेटा सेंटरच्या कामकाजावर परिणाम झाल्यानंतर केंद्रीय बँकेने हा आदेश दिला. एचडीएफसीने शेअर बाजाराला सांगितले की, आरबीआयने आपल्या डिजिटल 2.0 आणि इतर प्रस्तावित आयटी अनुप्रयोगांच्या अंतर्गत नवीन डिजिटल विकास योजना आणि नवीन क्रेडिट कार्डच्या सोर्सिंगला थांबविण्याचा सल्ला दिला आहे. एचडीएफसी बँक म्हणाली की, यासह बँकेच्या संचालक मंडळाला याची चौकशी करून उत्तरदायित्व निश्चित करण्यास सांगितले. आरबीआयने आधीच्या जुन्या प्रकरणांतून धडा घेतल्यानंतर कठोर निर्णय घेतले आहे, जेणेकरून पुढे कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत.

एचडीएफसीचा डिजिटल व्यवसाय किती मोठा?

क्रेडिट कार्ड – 1.49 कोटी
डेबिट कार्ड – 3.38 कोटी
यूपीआय सेवा – 179.5 दशलक्ष
पीओएस सेवा – 9.03 लाख
एटीएम – 14287

ग्राहकांवर कसा होणार परिणाम ?

एचडीएफसी बँकेकडून नवीन क्रेडिट कार्ड बनविली जाणार नाहीत
एचडीएफसी नवीन डिजिटल सेवांचा लाभ घेता येणार नाही
मोबाइल बँकिंग अपग्रेड वैशिष्ट्ये आणि इंटरनेट बँकिंगपासून वंचित राहणार
विद्यमान क्रेडिट कार्ड चालू राहील, यूपीआय आणि इतर विद्यमान सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही
चालू असलेल्या सेवांवर कोणतीही बंधन नाहीत.

Know How Safe Your Money In Your Bank Account

संबंधित बातम्या

Paytm च्या भागीदारीतून SBI ची दोन क्रेडिट कार्ड बाजारात, ऑनलाईन पेमेंटला मिळणार चालना

मोठी बातमी! HDFC बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही, RBIचे निर्बंध