नवी दिल्लीः जर आपण आपली नोकरी बदलल्यास ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बदलत्या नोकऱ्यांसह आपल्याला नवीन पीएफ खाते क्रमांक मिळणार आहे. आपण जुन्या पीएफ खात्यातील रक्कमही काढून घेऊ शकता किंवा नवीन पीएफ खात्यात पैसे हस्तांतरित करू शकता. जर पीएफची रक्कम आधीच्या कंपनीकडून नवीन कंपनीकडे वर्ग करायची असल्यास आपण ती सहजपणे घरूनही करू शकतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) पीएफ हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाईन सुविधा प्रदान करते. (Know How To Transfer EPF Online Check Details Here)
EPFO ने आता ईपीएफ हस्तांतरण सुविधा ऑनलाईन केलीय. EPFO ने स्वतः ट्विट करून या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली आहे. आपण ईपीएफ खात्यात जमा केलेली रक्कम नवीन ईपीएफ खात्यात कशी हस्तांतरित करू शकता हे तुम्हाला सांगणार आहोत.
टप्पा 1: ‘Unified Member Portal’ वर जा आणि यूएएन आणि संकेतशब्दाने येथे लॉगिन करा.
टप्पा 2: ‘Online Serrvice’ वर जा आणि Online Member-One EPF Account (Transfer Request) क्लिक करा.
टप्पा 3: सध्याच्या रोजगाराशी संबंधित वैयक्तिक माहिती आणि पीएफ खात्याची पडताळणी करा.
टप्पा 4: गेट डिटेल्सवर क्लिक करा. मागील रोजगारातील भविष्य निर्वाह निधीचा तपशील आपल्याला दिसेल.
टप्पा 5: फॉर्मच्या प्रमाणीकरणासाठी मागील कोणत्याही नियोक्ता किंवा वर्तमान नियोक्ता निवडा.
टप्पा 6: यूएएन नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी मिळविण्यासाठी ‘Get OTP’ वर क्लिक करा आणि ‘OTP’ प्रविष्ट करा आणि Submit वर क्लिक करा.
ओटीपी टाकल्यानंतर आपल्या कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रक्रियेसाठी विनंती केली जाईल. प्रथम कंपनी पैसे हस्तांतरित करेल आणि त्यानंतर ईपीएफओचा फील्ड अधिकारी याची पडताळणी करेल. हस्तांतरण विनंती पूर्ण झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण ट्रॅक क्लेम स्थितीवर आपली स्थिती तपासू शकता. ऑफलाईन हस्तांतरणासाठी आपल्याला फॉर्म 13 भरावा लागेल आणि आपल्या जुन्या किंवा नवीन कंपनीला द्यावा लागेल.
Know how to transfer EPF online
जानिए कैसे करें ई पी एफ ऑनलाइन ट्रांसफर#EPFO #SocialSecurity #HumHainNa pic.twitter.com/lvqCybMEiu
— EPFO (@socialepfo) January 27, 2021
आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ‘EPFOHO UAN LAN’ वर 7738399899 पाठवा.
>> 011-22901406 वर आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून एक मिस कॉल द्या.
>> ‘EPF Passbook Portal’ वर जा, आपल्या यूएएन आणि संकेतशब्दासह लॉग इन करा. ‘Download/View Passbook’ क्लिक करा.
>> EPFO वर जा, ‘Employee Centric Services’ वर क्लिक करा, ‘View Passbook’ निवडा आणि पासबुक पाहण्यासाठी यूएएनमधून लॉगिन करा.Know how to transfer EPF online
जानिए कैसे करें ई पी एफ ऑनलाइन ट्रांसफर#EPFO #SocialSecurity #HumHainNa pic.twitter.com/ZQIHHKizYf
— EPFO (@socialepfo) January 25, 2021
संबंधित बातम्या
तुमच्या PF वर व्याज मिळतंय की नाही? सोप्या पद्धतीने चेक करा
Know How To Transfer EPF Online Check Details Here