Gold Silver Price : अमेरिकेतील हालचालीमुळे सोन्याच्या किमती वाढल्या; जाणून घ्या तोळ्याचा भाव

चांदीबद्दल बोलायचे झाल्यास मार्च फ्युचर्सच्या व्यापारात 0.66 टक्क्यांची वाढ झाली

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:43 PM, 20 Jan 2021
Gold Silver Price : अमेरिकेतील हालचालीमुळे सोन्याच्या किमती वाढल्या; जाणून घ्या तोळ्याचा भाव

नवी दिल्लीः अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ट्रेझरी सेक्रेटरी म्हणून जेनेट येलेन यांचं नाव निर्देशित केल्यानं परदेशी बाजारपेठ तसेच भारतीय बाजारपेठेतील सोन्याची चमक वाढलीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारी वायदा व्यापार 0.43 टक्क्यांवर होताना दिसतो. MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,195 रुपयांवर आहे. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास मार्च फ्युचर्सच्या व्यापारात 0.66 टक्क्यांची वाढ झाली असून, तो प्रति किलो 66.472 रुपयांवर व्यापार करताना दिसत आहे. (Know The Gold Silver Price In Bullion Market And Mcx )

जागतिक बाजारपेठेबद्दल बोलताना अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. परदेशी बाजारात स्पॉट सोन्याचे दर 0.5 टक्क्यांनी वाढून 1848 डॉलर प्रति औंस झाले आहेत, तर चांदीमध्ये 0.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी अपेक्षा आहे की येत्या काही दिवसांत सोन्याची चमक कायम राहील.

बुलियन बाजाराची स्थिती

यापूर्वी मंगळवारी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीही वाढीनं बंद झाल्या. मंगळवारी सोन्याचा भाव 198 रुपयांनी वाढून 48,480 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. आदल्या दिवशी सोन्याचा भाव दहा ग्रॅम 48,282 रुपये होता. सोन्याबरोबरच चांदीचा भावही दिवसागणिक वाढतच चालला आहे. मंगळवारी दर 100 रुपयांनी वाढून, 65,340 रुपये प्रतिकिलो झाला. आदल्या दिवशी ते प्रति किलो 64,332 रुपये होते.

किंमत का वाढली?

बाजार तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, कोरोना लसीची बातमी प्रथम अमेरिकन प्रोत्साहन पॅकेजच्या बातमीनंतर आणि नवीन अध्यक्षांच्या निवडीनंतर आली. यापूर्वी कोरोना शिखरावर सोन्याने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला. केवळ ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे 8000 रुपयांची वाढ नोंदली गेली. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये चढउतार होऊ शकतात.

संबंधित बातम्या

Gold Price : 1 हजार रुपयांनी वाढली सोन्याची किंमत, जाणून घ्या आजचा दर

घरबसल्या 1 रुपयात सोने खरेदी करा; योजनेबद्दल सर्व काही जाणून घ्या

Know The Gold Silver Price In Bullion Market And Mcx