कोटक महिंद्रा IndusInd Bank च्या खरेदीच्या तयारीत; जाणून घ्या, ग्राहकांवर कसा पडणार प्रभाव

कोटक महिंद्रा बँक संपूर्ण स्टॉक मिळवू शकेल. तसेच यूकेमध्ये राहणाऱ्या हिंदुजा कुटुंबातील चार भावांमध्ये झालेल्या वादानंतरच या विक्रीची चर्चा जोर धरू लागली आहे.

कोटक महिंद्रा IndusInd Bank च्या खरेदीच्या तयारीत; जाणून घ्या, ग्राहकांवर कसा पडणार प्रभाव

नवी दिल्लीः कोटक महिंद्रा बँक आणि खासगी क्षेत्रातील IndusInd Bankच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कोटक महिंद्रा बँक खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँक ताब्यात घेऊ शकते, परंतु इंडसइंड बँकेच्या प्रवर्तक कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेडने (IIHL) या वृत्ताचं खंडन केलं आहे. (kotak mahindra takeover of indusind bank)

IIHLने सांगितले की, सध्या कंपनीचा असा कोणताही विचार नाही. रविवारी सायंकाळी उशिरा प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या आधारे ब्लूमबर्ग सांगितले की, कोटक महिंद्रा बँक संपूर्ण स्टॉक मिळवू शकेल. तसेच यूकेमध्ये राहणाऱ्या हिंदुजा कुटुंबातील चार भावांमध्ये झालेल्या वादानंतरच या विक्रीची चर्चा जोर धरू लागली आहे.

इंडसइंड बँकेचं बाजारमूल्य किती?

इंग्रजी वृत्तपत्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या वृत्तानुसार, इंडसइंड प्रवर्तकांचा सध्या इंडसइंड बँकेमध्ये 15 टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा आहे. याव्यतिरिक्त 85 टक्के शेअर्सची भागीदारी थकबाकीदार संस्थांमधील गुंतवणूकदारांकडे आहे. बाजारात बँकेच्या समभागाची किंमत 60 टक्क्यांच्या वाढीसह 607 रुपयांपेक्षा जास्त आहे. याशिवाय बँकेचं बाजारमूल्य (मार्केट कॅप) जवळपास 46,000 कोटी रुपये आहे.

विलीनीकरणानंतर कोणाचा वाटा वाढणार?

त्याशिवाय कोटक बँकेबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचं बाजारमूल्यही मोठं असून, 2.7 लाख कोटी रुपये आहे. जर सध्याच्या परिस्थितीत दोन्ही बँकांचे विलीनीकरण झाले तर हिंदुजा प्रवर्तकांचा वाटा 2 टक्क्यांनी वाढणार आहे.

लॉकडाऊनमध्ये घसरली भागीदारी

या दोन बँकांचे विलीनीकरण झाल्यास कोटक आणि इंडसइंड बँक यांच्यात बँकिंग करार केला जाईल, कारण कोटक बँकेकडे भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि तसेच कोटक बँकेची सध्या बाजारात चांगली मालमत्ता आहे. लॉकडाऊनदरम्यान 7,442 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री झाल्यानंतर प्रमोटर उदय कोटक यांच्या बँकेच्या शेअर्समध्ये जवळपास 26 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले.

बँकेच्या अधिकाऱ्यानं दिलं स्पष्टीकरण

कोटक महिंद्रा ग्रुपचे मुख्य संपर्क अधिकारी रोहित राव म्हणाले, “आमच्याकडे सध्या यावर कोणतीही प्रतिक्रिया नाही.” मॉरिशसच्या IIHL या कंपनीने ब्लूमबर्गचा अहवाल नाकारला आहे. आम्हाला यासंदर्भात कोणतीही माहिती नाही.

RBI ने दंड आकारला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) इंडसइंड बँकेवर साडेचार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या काही सूचनांचे पालन बँकेने केलेले नाही. बँक आणि ग्राहक यांच्यातील कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *