कोटक सिक्युरिटीजचं ग्राहकांना मोठं गिफ्ट, शेअर खरेदी आणि विक्री आता मोफत

इतर सर्व फ्यूचर अँड ऑप्शन्स (F&O) साठी 20 रुपये प्रति ऑर्डर चार्ज आहे. एफ अँड ओमधील इक्विटी, कमोडिटी आणि करन्सी प्रकारातील निश्चित ब्रोकरेज योजना उपलब्ध आहे.

कोटक सिक्युरिटीजचं ग्राहकांना मोठं गिफ्ट, शेअर खरेदी आणि विक्री आता मोफत

नवी दिल्लीः कोटक सिक्युरिटीज (Kotak Securities) ने शेअर्सची खरेदी विक्री करणाऱ्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. कोटक सिक्युरिटीज (Kotak Securities) ने इंट्रा-डे ट्रेडिंग (Intraday trading) मध्ये ब्रोकरेज शुल्क वसूल करणार नसल्याची घोषणा केली आहे. इतर सर्व फ्यूचर अँड ऑप्शन्स (F&O) साठी 20 रुपये प्रति ऑर्डर चार्ज आहे. एफ अँड ओमधील इक्विटी, कमोडिटी आणि करन्सी प्रकारातील निश्चित ब्रोकरेज योजना उपलब्ध आहे.(Kotak Securities Launches Plan With Zero Brokerage On Intra Day Trades)

ट्रेड फ्री प्लाननं जर ग्राहक समाधानी नसतील तर महिन्याभरात फी परतावा आणि दलाली परत मिळण्याची सुविधाही यात मिळते. ग्राहक ट्रेडिंगसाठी मार्जिनच्या स्वरूपात पैशांऐवजी शेअर्सदेखील देऊ शकतात. कोटक सिक्युरिटीज एफ अँड ओ प्रकारातील बाजारातील हिस्सा सुधारण्यास मदत करेल.

कोटक महिंद्रा बँकेची सहाय्यक कोटक सिक्युरिटीज 25 वर्षांहून अधिक काळापासून ब्रोकिंग व्यवसायात असून, जवळपास त्यांचं बाजारमूल्य 5,000 कोटी रुपये एवढे आहे, जे भारतीय ब्रोकिंग उद्योगात सर्वाधिक आहे. कोटक सिक्युरिटीजचे चेअरमन एस. ए नारायण म्हणाले, केएसचं लक्ष्य परंपरागत कॅश डिलिव्हरी आधारित ग्राहकांवर आहे. जे जास्त करून बाजारात सक्रिय असतात. कोरोना साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून व्यापारातील हालचाली मंदावल्यात आहेत. त्यामुळे अशा नवनवीन योजनांकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

युरोपमधील बाजारपेठ आणि आर्थिक शेअर्समधील वाढीमुळे शुक्रवारी बाजारात तेजीसह बंद झाला. बीएसईचा सेन्सेक्स 282.29 अंकांनी वधारून 43,882.25 वर तर निफ्टी 71.95 अंकांनी खाली येऊन 12,843.65 वर बंद झाला. आज बाजारात आयटी आणि बँकिंग शेअर्सची चांगली खरेदी झाली. बाजारातील वाढीमुळे बीएसईतील सूचीबद्ध कंपन्यांचं बाजारमूल्यही 171 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

90 टक्क्यांहून अधिक कोरोना लसीचा प्रभाव
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्येही उत्साह संचारलेला पाहायला मिळतोय. अमेरिकन औषधनिर्माण कंपनी Pfizer आणि जर्मन बायोटेक कंपनी यांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली लस अधिक प्रभावी आहे. या दाव्याचा परिणाम जागतिक बाजारातही दिसून आला होता.

संबंधित बातम्या

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या तोळ्याचा भाव

पगाराला हात न लावता गुंतवणुकीचा सोपा आणि भन्नाट मार्ग, जबरदस्त फायदा शक्य

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *