लसीच्या बातमीमुळे सोने-चांदी 1700 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या तोळ्याचा भाव

एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचे भाव 499 रुपयांनी घसरून 48,730 रुपयांवर आले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:41 PM, 16 Jan 2021
लसीच्या बातमीमुळे सोने-चांदी 1700 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या तोळ्याचा भाव

नवी दिल्लीः आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्राच्या दिवशीच सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालीय. एमसीएक्सवर फेब्रुवारी महिन्यातील डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव (Gold Price) प्रति दहा ग्रॅम 48,702 रुपयांवर बंद झालाय. सोन्याच्या किमतीत 519 रुपयांची घसरण झाली. त्याचप्रमाणे एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचे भाव 499 रुपयांनी घसरून 48,730 रुपयांवर आले. (Latest Rates For Gold And Silver Loosing Shine After Corona Vaccine)

सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही (Silver loosing shine) घसरणीची नोंद झालीय. मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा दर 1703 रुपयांनी घसरून 64,980 रुपयांवर आलाय. मे डिलिव्हरीसाठी चांदी 1658 रुपयांनी घसरून 65,613 रुपयांवर बंद झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने-चांदीचे दर (Gold international price)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या (Gold international price) दरात मोठी घसरण झालीय. आठवड्याच्या अखेरच्या व्यापार सत्रात फेब्रुवारी महिन्यातील सोन्याचा भाव 23.55 डॉलरच्या घसरणीसह (-1.27%) 1827.85 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 0.98 डॉलर (-3.83%)) घसरणीसह 24.81 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर बंद झालाय.

मागणीला गती येणार (World Gold Council)

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) म्हणण्यानुसार, कोरोना लसीच्या बातम्यांमुळे सन 2020 च्या उत्तरार्धात सोन्याची मागणी कमी झाली आणि यामुळे किमती देखील खाली आल्यात. पण लवकरच मागणी वाढणार आहे. जर मागणीत तेजी आली, तर किंमत देखील वाढेल. जगातील सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक भारत आहे. WGC च्या माहितीनुसार, 2020 मध्ये बरेच सण साजरे केले जातात.

येत्या काळात सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. यंदाच्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक कयास बांधला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.

संबंधित बातम्या

Special Story | लसीकरणाची नांदी आणि अर्थव्यवस्थेची घसरगुंडी; सोन्यातील गुंतवणूक ठरणार का फायदेशीर?

Gold/Silver Rate Today: तीन दिवसांत दोनदा सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे दर

Latest Rates For Gold And Silver Loosing Shine After Corona Vaccine