Gold Silver Price Today | सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या तोळ्याचा दर

सत्रातील चांदीचा भाव आज 144 रुपयांनी वाढून 65,351 रुपये झाला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:56 PM, 13 Jan 2021
Latest Rates Gold Silver
सोने

नवी दिल्लीः सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात घसरण झालीय. तर चांदीचा भाव सराफा बाजारात वाढलाय. रुपयाच्या मूल्यात झालेल्या सुधारणांमुळे बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव (Gold Rate Today) 108 रुपयांनी घसरून 48,877 रुपयांवर बंद झाले, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली, ज्यामुळे मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,985 रुपयांवर बंद झाले होते. (Latest Rates For Gold And Silver On 13 January In Patna Pune Jaipur And Lucknow)

सत्रातील चांदीचा भाव प्रतिकिलो आज 144 रुपयांनी वाढून 65,351 रुपये झाला आहे. तर गुरुवारी रुपया 10 पैशांनी वाढून 73.15 रुपये प्रति डॉलरवर बंद झालाय. एचडीएफसी सिक्युरिटीज वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) पटेल म्हणाले, डॉलरच्या किमतीमुळे सोन्याच्या किमती (आंतरराष्ट्रीय बाजारात) वाढल्या.

पाटणा, पुणे, जयपूर, लखनऊमधील सोन्याची किंमत

गुड रिटर्न्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, पुण्यात आज 22 कॅरेट सोन्याची प्रतितोळा किंमत 48,460 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर दहा ग्रॅम 49,460 रुपये आहे. अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची प्रतितोळा किंमत 48,590 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची प्रतितोळा किंमत 50,590 रुपये आहे. जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची प्रतितोळा किंमत 48,350 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची प्रतितोळा किंमत 52,750 रुपये आहे. लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची प्रतितोळा किंमत 48,350 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची प्रतितोळा किंमत 52750 रुपये आहे. पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची प्रतितोळा किंमत 48460 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची प्रतितोळा किंमत 49460 रुपये आहे.

MCX वर सोने आणि चांदीची किंमत

सायंकाळी 6.45 वाजता एमसीएक्सवर सोन्याची डिलिव्हरी दिसते. यावेळी फेब्रुवारी डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 176 रुपयांनी वधारून 49,221 रुपये झाला. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये सोन्याचा भाव 196 रुपयांच्या वाढीसह प्रतितोळा 49,230 रुपयांवर होता. यावेळी चांदीच्या डिलीव्हरीत घट झाली आहे. मार्च डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव 556 रुपयांनी घसरून 65350 रुपये प्रतिकिलो पातळीवर होता. यावेळी चांदीचा भाव 414 रुपयांनी घसरून 66270 रुपयांच्या पातळीवर व्यापार करीत होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचा दर

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमती वाढताना दिसल्या. इन्व्हेस्टिंग डॉट कॉमच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यातील डिलिव्हरीच्या सोन्याचे भाव रात्री 7 वाजता 9.50 डॉलर वाढीसह 1853.70 डॉलर प्रति औंस पातळीवर होते. यावेळी चांदीमध्ये किंचित घट झाली. मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव प्रति औंस 0.09 डॉलरच्या घसरणीसह 25.34 डॉलर खाली घसरला.

संबंधित बातम्या

Gold-Silver Price Today | सोनं-चांदीच्या दरात आजही वाढ, जाणून घ्या आजचे दर

Gold/Silver Rate Today: तीन दिवसांत दोनदा सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे दर

Latest Rates For Gold And Silver On 13 January In Patna Pune Jaipur And Lucknow