LIC च्या लाखो कर्मचार्‍यांसाठी गुडन्यूज, तब्बल 16 टक्क्यांनी पगारवाढ

एलआयसी लवकरच देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. (LIC employees get 16 Percent wage hike)

LIC च्या लाखो कर्मचार्‍यांसाठी गुडन्यूज, तब्बल 16 टक्क्यांनी पगारवाढ
LIC च्या लाखो कर्मचार्‍यांसाठी गुडन्यूज, तब्बल 16 टक्क्यांनी पगारवाढ
Namrata Patil

|

Apr 16, 2021 | 4:30 PM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कंपनी भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) च्या लाखो कर्मचाऱ्यांचा पगारात वाढ होणार आहे. सरकारने एलआयसी कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 ते 16 टक्क्याने वाढ करण्यास मान्यता दिली आहे. तसेच आठवड्यातून पाच दिवस कामाच्या धोरणालाही मंजुरी दिल्याचे बोललं जात आहे. एलआयसी व्यवस्थापनाने गेल्यावर्षी 16 टक्के वेतनवाढ प्रस्तावित केली होती. हा प्रस्ताव देतेवेळी विविध कर्मचाऱ्यांच्या गृह कर्जावरील व्याज दरामध्ये 100 बेसिस पॉईंट्स कमी करण्याची घोषणा देखील केली होती. (LIC employees get 16 Percent wage hike)

एलआयसीच्या इतिहासात पहिल्यांदा वेतन पुनर्परीक्षणाला उशीर 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, एलआयसी व्यवस्थापनाने पाठवलेल्या प्रस्तावावेळी अर्थ मंत्रालयाकडून त्याला तत्वत: मान्यता देण्यात आली होती. तसेच एलआयसी लवकरच देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याची तयारी करत आहे.

एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वेतन पुनर्परीक्षण 1 ऑगस्ट 2017 रोजी करण्यात आले होते. ते पुनर्परीक्षण पाच वर्ष कायम राहते. मात्र एलआयसीच्या इतिहासात असे पहिल्यांदा झाले आहे की, वेतन पुनर्परीक्षणासाठी उशीर झाला आहे, असे एका युनियनच्या नेत्याने सांगितले आहे.

आयपीओपूर्वी अधिकृत भांडवल वाढेल

यंदाच्या अर्थसंकल्पात LIC चा आयपीओ येणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलीय. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असल्यानं ती शेअर बाजारात उतरल्यानंतर तिच्या शेअर्सचीही किंमत मोठी राहणार आहे.  एलआयसीची अधिकृत भांडवल वाढवून 25,000 कोटी करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला असून, यामुळे पुढील आर्थिक वर्षात कंपनीच्या लिस्टिंगसाठी मदत होईल. सध्या 29 कोटी पॉलिसी असलेल्या जीवन विमा कंपनीचे पेड-अप भांडवल 100 कोटी रुपये आहे. एलआयसीची सुरुवात 1956 मध्ये 5 कोटींच्या आरंभिक भांडवलाने झाली. एलआयसीचा मालमत्ता आधार 31,96,214.81 कोटी रुपये आहे.

एलआयसीच्या आयपीओमधील कोणीही नोकरी गमावणार नाही

एलआयसी निर्गुंतवणुकीवरील प्रश्नांना उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, आम्ही फक्त आयपीओ आणत आहोत. भाग कमी करण्याची मर्यादा अद्याप निश्चित केलेली नाही. प्रस्तावित आयपीओमुळे कोणालाही एलआयसीमध्ये नोकरी मिळणार नाही. 2017-18 मध्ये विमा कंपनीने 48,436 कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळविले त्यापैकी 46,014 कोटी रुपये पॉलिसीधारकांना आणि 2,421 कोटी रुपये सरकारकडे वाटून घेतले. त्याचबरोबर 2019-20 मध्ये 53,954 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न तयार झाले होते, त्यापैकी 51, 257 कोटी रुपये पॉलिसीधारकांना आणि उर्वरित 2,697 कोटी सरकारला देण्यात आले. (LIC employees get 16 Percent wage hike)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी! सिटी बँक भारतातून आपला व्यवसाय गुंडाळणार, जाणून घ्या ‘कारण’

Post Office मध्ये मिळतो विमा, दररोज 95 रुपये वाचवून मिळणार 14 लाख रुपये

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें