LIC Policy: दररोज अवघ्या 160 रुपयांच्या बचतीवर मिळणार 23 लाख; टॅक्स बेनिफिट्स आणि इतर अनेक फायदे

नवीन मनीबॅक पॉलिसी आपल्यासाठी चांगला पर्याय बनू शकेल. चला एलआयसीच्या या पॉलिसीबद्दल जाणून घेऊया...

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:20 PM, 25 Jan 2021
LIC Policy: दररोज अवघ्या 160 रुपयांच्या बचतीवर मिळणार 23 लाख; टॅक्स बेनिफिट्स आणि इतर अनेक फायदे
Budget 2021

नवी दिल्ली : आपणास आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असल्यास आपण भारतीय जीवन विमा महामंडळाच्या अनेक पॉलिसीचा लाभ घेऊ शकता. एलआयसी पॉलिसीअंतर्गत आपल्याला केवळ विमा संरक्षण मिळणार नाही, तर आपल्या भविष्यासाठी बरीच रक्कम जमा करण्यास मदत होणार आहे. सध्या एलआयसीकडे अशा अनेक पॉलिसी आहेत, ज्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. यापैकी काही पॉलिसी दीर्घकालीन आणि काही अल्प मुदतीसाठी आहेत. आपल्याला थोडी गुंतवणूक करायची असल्यास एलआयसीची पॉलिसी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नवीन मनीबॅक पॉलिसी आपल्यासाठी चांगला पर्याय बनू शकेल. चला एलआयसीच्या या पॉलिसीबद्दल जाणून घेऊया… (Lic New Money Back Policy Premium Maturity Tax Benefit And Other Detail With Return Calculator)

एलआयसीची नवीन मनी बॅक पॉलिसी एक प्रकारची नॉन-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, जी हमी परतावा आणि बोनस देते. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे विमाधारकाला 5 वर्षांत चांगले पैसे परत मिळतात. तसेच दरवर्षी कर विम्याचा लाभ मिळतो.

कर सवलतीत बरेच फायदे उपलब्ध

एलआयसीची ही एक संपूर्ण करमुक्त पॉलिसी आहे. यासह त्याचं व्याज, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्युरिटीवर प्राप्त झालेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही. जर आपण 25 वर्षांसाठी दररोज 160 रुपये गुंतविले तर 25 वर्षांनंतर आपल्याला 23 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतील.

दर पाचव्या वर्षी 20 टक्के पैसे परत मिळणार

एलआयसीच्या मते, 13 वर्षे ते 50 वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती ही योजना घेऊ शकते. या योजनेत दर पाचव्या वर्षी म्हणजेच 5 व्या वर्षी, 10 व्या वर्षी, 15 व्या वर्षी, 20 व्या वर्षी आपल्याला 15-20% पैसे परत मिळतील. परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा प्रीमियमच्या किमान 10 टक्के रक्कम जमा केली जाईल. याद्वारे गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर बोनस दिला जाईल. एकूण 10 लाख रुपयांच्या या योजनेत आपणास अपघाती मृत्यूचा लाभही मिळेल. मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना बोनसही दिला जाईल.

संबंधित बातम्या

LIC New Jeevan Shanti Yojana: एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर 74,300 रुपये पेन्शन मिळवा

फक्त 500 रुपये जमवून ‘या’ योजनेत गुंतवणूक करा; 70 लाखांच्या नफ्यासह मिळणार 1 कोटी रुपये

Lic New Money Back Policy Premium Maturity Tax Benefit And Other Detail With Return Calculator