PM SVANidhi Scheme : फेरीवाल्यांसाठी केंद्राची मोठी योजना, 3 लाख पथ विक्रेत्यांना कर्जवाटप

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत (Pradhan Mantri Street Vendor’s Atmanirbhar Nidhi Yojana) सुमारे 3 लाख पथ विक्रेत्यांना कर्ज वाटप करणार आहेत.

PM SVANidhi Scheme : फेरीवाल्यांसाठी केंद्राची मोठी योजना, 3 लाख पथ विक्रेत्यांना कर्जवाटप

नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या काळातही मोदी सरकारनं सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत (Pradhan Mantri Street Vendor’s Atmanirbhar Nidhi Yojana) सुमारे 3 लाख पथ विक्रेत्यांना कर्ज वाटप करणार आहेत. तसेच ते योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाददेखील साधणार आहेत. (PM Modi to virtually distribute loans to 300,000 street vendors )

कोरोना व्हायरस साथीनं पीडित, रस्त्यावर माल विक्री करणा-या गरीब लोकांसाठी 1 जून 2020ला पंतप्रधान स्वानिधी योजना सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील माझ्या बंधू-भगिनींशी मी संवाद साधणार असून, जे रस्त्यावर वस्तूंची विक्री करतात, त्यांना मार्गदर्शन करणार आहे. पंतप्रधान स्वानिधी योजनेने त्यांना नवीन शक्ती मिळणार असून, एक चांगली संधीही उपलब्ध होणार आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी ट्विट करत सांगितले आहे.

पीएम स्वानिधी योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना अनुदानाच्या स्वरूपात 10 हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल मिळणार आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार या योजनेंतर्गत आतापर्यंत 24 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत, उत्तर प्रदेशातील विक्रेत्यांकडून आलेले 557,000 अर्ज देशभरातील सर्वाधिक आहेत. यूपीमधून तब्बल 3.27 लाख अर्ज मंजूर झाले असून 1.87 लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे. एकूण अर्जांपैकी 12 लाख मंजूर झाले असून, सुमारे 5.35 लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमास उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्ती केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच फिरत्या विक्रेत्यांसाठी मोदी सरकारने 5 हजार कोटी रुपयांची विशेष योजना जाहीर केली होती.  याचा लाभ देशभरातील अंदाजे 50 लाख फेरीवाल्यांना होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *