नवी दिल्लीः पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol & Diesel) वाढत्या किमतीनंतर सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder Price) च्या किमतीत प्रति सिलिंडर 25 रुपयांची वाढ केलीय. नवीन किंमती 25 फेब्रुवारी 2021 पासून लागू झाल्यात. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आता विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत आता 794 रुपये झालीय. फेब्रुवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये ही तिसरी वाढ आहे. एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या किमतींमध्ये ही वाढ अशा वेळी झालीय, जेव्हा पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलंय. (Lpg Gas Cylinder Price Hiked Gain By Rs 25 Per Cylinder Check Latest Rate)
फेब्रुवारीमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीतील ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी 4 फेब्रुवारीला 25 रुपयांची वाढ झाली होती, 14 फेब्रुवारीला 50 रुपयांची वाढ झाली होती. त्याच वेळी 25 फेब्रुवारीला त्यात 25 रुपयांची वाढ झालीय. म्हणजेच या महिन्यात एलपीजीच्या किमतीत 100 रुपयांची वाढ झाली आहे.
एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ झाल्यानंतर दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 769 रुपयांवर वाढून 794 रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये गॅस सिलिंडरसाठी 820.50 रुपये, मुंबई 794 रुपये आणि चेन्नईला 760 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी दिल्लीत एलपीजीची किंमत 769 रुपये, कोलकातामध्ये 795.50 रुपये, मुंबईत 769 रुपये आणि चेन्नईमध्ये 785 रुपये होती.
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असती तरी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किमती खाली आल्यात. आज त्याची किंमत प्रति सिलिंडरमध्ये पाच रुपयांनी कमी करण्यात आलीय. या कपातीनंतर दिल्लीतील 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1523.50 रुपये प्रति सिलिंडर होती. तसेच कोलकाता येथे वाणिज्यिक सिलिंडर्सची किंमत 1584 रुपये, मुंबईत 1468 रुपये आणि चेन्नईमध्ये 1634.50 रुपये होती.
एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या संकेतस्थळावर आपण आपल्या शहर गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.
संबंधित बातम्या :
सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका, LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ
LPG Gas Cylinder Price: फेब्रुवारीत LPG सिलिंडरच्या किमतीत मोठे बदल; किती पैसे द्यावे लागणार?
Lpg Gas Cylinder Price Hiked Gain By Rs 25 Per Cylinder Check Latest Rate