एक विवाहित स्त्री जास्तीत जास्त किती सोने खरेदी करू शकते; नियम काय सांगतात?

एखादा व्यक्ती स्वत: कडे किती सोनं बाळगू शकतो, याबद्दलही कायद्यात नमूद केलेय. gold a married woman can buy

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:24 PM, 3 Apr 2021
1/5
डॉलरच्या वाढीदरम्यान आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार घसरला असून, सोन्या-चांदीच्या किमती (Gold Silver rate) खाली आल्यात. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 15 रुपयांच्या किरकोळ घसरणीसह सोन्याचा भाव (Gold rate today) प्रति दहा ग्रॅम 44949 रुपयांवर बंद झाला. यापूर्वी व्यापार सत्रात सोन्याचे भाव 44964 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. रुपयाच्या तुलनेत डॉलर 18 पैशांनी वाढून 73.30 वर बंद झाला.
2/5
gold83794
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती (Gold international rate) कमी होत असल्याचे दिसून येत आहे. इन्व्हेस्टिंग डॉट कॉमच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जून डिलीव्हरीसाठी सोन्याचे दर प्रति औंस 1,724.35 डॉलर होते, ते 4.05 डॉलरने (-0.23%) घसरले. एमसीएक्सवर दुपारी 3.40 वाजता जून डिलिव्हरीचे सोने प्रति 10 ग्रॅम 143 रुपयांनी घसरून 45275 रुपये आणि ऑगस्टच्या डिलीव्हरीचे सोने 99 रुपयांनी घसरून 45526 रुपयांवर गेले.
3/5
सोनं दागिन्यांच्या स्वरूपात ठेवण्यास मर्यादा नाही, परंतु ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे कुठून आणले याची माहिती द्यावी लागेल. आपल्याला दागदागिने वारशात मिळाल्यास आपली वारसापत्र दाखवावे लागेल, डिसेंबर 2016 रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की, जर गुंतवणूक किंवा वारशातून मिळालेल्या सोन्याचा पुरावा दिल्यास सोन्याचे दागिने ठेवण्यास कोणतीही मर्यादा नाही.
4/5
कर सल्लागार नारायण जैन म्हणतात, सोने ठेवण्याची ही मर्यादा मुळात आयटी रिटर्न्स न भरणाऱ्यांसाठी आहे. या मर्यादेबाहेर सोन्याला परवानगी आहे, परंतु त्यामध्ये काही अटी आहेत. आपणास मिळालेले सोने आपण वारशात मिळालेलं सिद्ध करण्यात अक्षम असल्यास आयटी अधिकारी आपले सोने जप्त करू शकतात.
5/5
gold price today (2)
गिफ्ट म्हणून मिळालेल्या सोन्याची माहिती कौटुंबिक करारांद्वारे लेखी स्वरूपात देणेसुद्धा आवश्यक आहे. 2019 पासून तुम्ही 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी केल्यास तुम्हाला तुमचा पॅन द्यावा लागेल. सर्व सोन्याच्या खरेदीची पावती, मग ते दागिने असोत किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने विकत घेतले गेलेले सोने असो, ते सुरक्षित ठेवले पाहिजे, कारण भविष्यात त्याची गरज पडू शकते.