आता लस तयार करण्यासाठी 4500 कोटींच्या क्रेडिटला मंजुरी, केंद्राचा मोठा निर्णय

कोरोना लस उत्पादक भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) यांना पुरवठा क्रेडिट देण्यास अर्थ मंत्रालयाने सोमवारी मान्यता दिली. serum institute bharat biotech

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:59 PM, 19 Apr 2021
आता लस तयार करण्यासाठी 4500 कोटींच्या क्रेडिटला मंजुरी, केंद्राचा मोठा निर्णय
serum institute bharat biotech

नवी दिल्ली: कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत असलेल्या देशात लसीकरण वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कोरोना लस उत्पादक भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) यांना पुरवठा क्रेडिट देण्यास अर्थ मंत्रालयाने सोमवारी मान्यता दिली. (Now approving Rs 4,500 crore credit for vaccine manufacturing serum institute bharat biotech, a big decision of the modi government)

भारत बायोटेकसाठी 1,500 कोटी रुपयांचे क्रेडिट

कोरोनासाठी प्रभारी नोडल मंत्र्यांना प्रथम क्रेडिट मंजूर केले जाईल, नंतर ते कोरोना लस तयार करण्यासाठी दोन कंपन्यांकडे सोपवले जाईल. मंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासाठी 3,000 कोटी आणि भारत बायोटेकसाठी 1,500 कोटी रुपयांचे क्रेडिट दिलेत.

अदर पूनावाला यांच्या अपिलानंतर केंद्र सरकारचा निर्णय

मंत्रालयाचा निर्णय सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर्श पूनावाला यांनी कोविड लसीची क्षमता वाढविण्यासाठी सरकारला 3,000 कोटी रुपयांच्या अनुदानाची विनंती केल्यानंतर काही दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीस सीएनबीसी टीव्ही 18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पूनावाला म्हणाले की, सरकार “सीरमसारख्या अनेक लसी उत्पादकांबरोबर काम करत आहे आणि आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी इतर नवीन मार्गांचा शोध घेत आहे.”

कोविड 19 वर अर्थमंत्र्यांनी विविध उद्योग संघटनांशी केली चर्चा

पुणे स्थित लस उत्पादक SII ची अपेक्षा आहे की, जून 2021 पर्यंत त्यांची उत्पादन क्षमता वाढेल. दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी देशातील Covid-19 व्यवस्थापनाबाबत इंडिया इंकच्या प्रश्नांसमवेत विविध उद्योग मंडळांसह चर्चा केली. सीतारमण म्हणाल्या की, साथीच्या रोगादरम्यान लोकांचे जीवन आणि जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारसमवेत काम करत राहील. अर्थमंत्र्यांनी ट्विट केले की, “पुढील प्रत्येक व्यवसाय/चेंबर नेत्यांशी दूरध्वनीवरून बोललो. उद्योग आणि संघटनांशी संबंधित गोष्टींबद्दल त्यांची माहिती आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून वेगवेगळ्या स्तरावर भारत सरकार व्यवस्थापनाला प्रतिसाद देत आहे, याची माहिती दिली. Now approving Rs 4,500 crore credit for vaccine manufacturing serum institute bharat biotech, a big decision of the modi government

संबंधित बातम्या

IIT मंडीकडून सेल्फ क्लिनिंग फेस मास्क तयार; कोरोनाला फक्त रोखणार नाही, तर खात्मा करणार

UAN नंबर माहीत नाही, घाबरू नका, अशा पद्धतीनं काढता येणार पीएफ खात्यातून पैसे

covid 19 vaccine govt approves rs 4500 crore credit to serum institute bharat biotech