आता आकाशात राज्य करण्याची लढाई! टाटांनंतर झुनझुनवाला मैदानात, ‘Akasa Air’ या विमान कंपनीला मंजुरी

आकाश एअरला जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांनी पाठिंबा दिलाय. विमान कंपनी आता डीजीसीएकडून परवाना मिळण्याची वाट पाहत आहे. जर परवाना वेळेवर मिळाला, तर 2022 च्या उन्हाळ्यात तुम्ही आकाश एअरने हवाई प्रवास करू शकाल. इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष हेही आकाश एअरच्या बोर्डात आहेत.

आता आकाशात राज्य करण्याची लढाई! टाटांनंतर झुनझुनवाला मैदानात, 'Akasa Air' या विमान कंपनीला मंजुरी
Akasa Air
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 7:37 AM

नवी दिल्लीः कोरोना महामारीमुळे विमान कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागतेय, परंतु अनुभवी उद्योगपतींना वाटते की, येत्या काळात हा एक फायदेशीर करार ठरेल. देशातील वॉरेन बफे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअरलाईन्सला सरकारकडून एनओसी प्रमाणपत्र मिळालेय. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडने याबाबत माहिती शेअर केलीय. ते म्हणाले की, कंपनी लवकरच ‘Akasa Air’ या नावाने विमान सेवा सुरू करेल. असे मानले जाते की, पुढील वर्षी उन्हाळी हंगामात त्यांचे ऑपरेशन सुरू केले जाईल.

आकाश एअरला जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांचा पाठिंबा

आकाश एअरला जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांनी पाठिंबा दिलाय. विमान कंपनी आता डीजीसीएकडून परवाना मिळण्याची वाट पाहत आहे. जर परवाना वेळेवर मिळाला, तर 2022 च्या उन्हाळ्यात तुम्ही आकाश एअरने हवाई प्रवास करू शकाल. इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष हेही आकाश एअरच्या बोर्डात आहेत. त्यांनी विनय दुबे यांच्या टीमला एनओसी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. अलीकडेच राकेश झुनझुनवाला आणि पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीसंदर्भात पीएम मोदींनी ट्विट केले होते की, मला त्यांना भेटून आनंद झाला आणि ते भारतीय बाजाराबद्दल खूप उत्साही आहेत.

एअरबस आणि बोईंग यांच्याशी बोलणी सुरू

एअरबस चीफ कमर्शियल ऑफिसर क्रिस्टीन शेररने अलीकडेच वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिची कंपनी विमान खरेदीसाठी आकाश एअरशी चर्चा करीत आहे. अनेक मीडिया रिपोर्टनुसार, आकाश एअरने अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगशीही संपर्क साधला. त्याला बोईंगकडून B737 मॅक्स विमान खरेदी करण्यात रस आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बोईंग B737 मॅक्स विमानांच्या मदतीने आणि एअरबस A320 विमानांच्या मदतीने विमान उद्योगात स्पर्धा करत आहे.

उन्हाळी हंगामात ऑपरेशन सुरू करण्याची योजना

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश एअर पुढील वर्षी उन्हाळी हंगामात ऑपरेशन सुरू करण्याची योजना आखत आहे. पुढील चार वर्षांत कंपनीने 70 विमानांचा ताफा तयार करण्याची योजना आखली आहे. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफेट म्हणतात. त्याची संपत्ती $ 5.7 अब्ज (ऑक्टोबर 2021) आहे. त्यांनी एअरलाईन कंपन्यांमध्ये जवळपास 250 कोटींची गुंतवणूक केलीय.

टाटांनी एअर इंडियाला 18 हजार कोटींमध्ये खरेदी केले

अलीकडेच टाटा समूहाने एअर इंडियाला 18 हजार कोटींमध्ये खरेदी केले आहे. विस्तारा, एअर एशिया इंडिया एअरलाईनच्या मदतीने टाटा समूह विमान क्षेत्रामध्ये आधीच उपस्थित होता. 2020-21 या आर्थिक वर्षात दोन्ही विमान कंपन्यांचे एकत्रित नुकसान 3200 कोटींपेक्षा जास्त होते. आता एअर इंडिया खरेदी केल्यानंतर टाटा समूहाच्या आकाश उड्डाणाचा आकार खूप मोठा झालाय.

संबंधित बातम्या

सोने आणि चांदीची किंमत आणखी स्वस्त, पटापट तपासा ताजे दर

नोकरी न सोडता जास्तीत जास्त पीएफचे पैसे कसे काढायचे, जाणून घ्या

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.