एकाच मोबाईल क्रमांकावरून तयार करा संपूर्ण कुटुंबाचं आधार कार्ड; UIDAI ची माहिती

केवळ एका मोबाईल नंबरवरून आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी असे आधार कार्ड बनवू शकता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:39 PM, 13 Jan 2021
PVC Aadhar Card

नवी दिल्लीः तुम्हालाही एटीएमसारखे पीव्हीसी आधार कार्ड बनवायचे असतील तर आता यासाठी तुम्हाला वेगवेगळे मोबाइल नंबर देण्याची गरज नाही. आधारच्या अधिकृत वेबसाईटने ट्विटद्वारे याची माहिती दिलीय. UIDAI ने गेल्या वर्षी ही सुविधा सुरू केली होती, आता एक नवीन सुविधा सुरू करण्यात आलीय. ज्या अंतर्गत संपूर्ण कुटुंबासाठी एटीएमसारखे आधार कार्ड बनविण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मोबाईल नंबर देण्याची आवश्यकता नाही. केवळ एका मोबाईल नंबरवरून आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी असे आधार कार्ड बनवू शकता. (Now With Single Mobile Number You Can Book PVC Aadhar Card For Whole Family)

UIDAI ने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. आधारमध्ये नोंदविलेले मोबाईल नंबर विचारात न घेता या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोणताही मोबाईल नंबर वापरून कोणत्याही ओटीपीची मागणी करू शकतो. याअंतर्गत केवळ एक व्यक्ती संपूर्ण कुटुंबासाठी आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाईन ऑर्डर करू शकते.

केवळ 50 रुपये खर्च करावे लागतील

जर तुम्हाला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त 50 रुपये खर्च करावे लागतील. या सुविधेसाठी UIDAIने केवळ 50 रुपये शुल्क आकारले आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. या कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्वीपेक्षा लहान आहे आणि अगदी एटीएम किंवा डेबिट कार्डसारखे आहे. जेणेकरून आपण ते सहजपणे आपल्या पाकिटात ठेवू शकता. आपण या सुविधेचा लाभ ऑनलाईन घेऊ शकता.

अशा प्रकारे प्रक्रिया पूर्ण होईल
आपणाससुद्धा घरी बसून पीव्हीसी बनलेले आधार कार्ड मिळवायचे असेल तर आपल्याला काही सोप्या टप्प्यांचे पालन करावे लागेल. सर्व प्रथम आपल्याला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तेथे माझा आधार नावाच्या विभागात क्लिक करून आपल्याला नवीन आधार कार्ड ऑर्डर करावे लागेल. यानंतर आपण आपला 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा. नंबर भरल्यानंतर, सुरक्षा कोड भरा, कॅप्चा योग्यरित्या भरा आणि सेंट ओटीपी वर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. हे ओटीपी जोडल्यास पीव्हीसीसह आपले आधार कार्ड प्राप्त होईल. त्यानंतर 50 रुपयांचे पेमेंट ऑनलाईन जमा करावे लागेल. पेमेंट प्रक्रिया पूर्ण होताच, आपला नवीन आधार 5 दिवसांत आपल्या घरी पोहोचेल.

संबंधित बातम्या

क्रेडिट-डेबिट कार्ड वापरताय? सावधान! ‘या’ चुकीमुळे होऊ शकते संपूर्ण खाते रिकामी…

घरबसल्या बनवा पॉकिटमध्ये ठेवता येणारं नवीन Aadhaar PVC Card, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Now With Single Mobile Number You Can Book PVC Aadhar Card For Whole Family