पत्नीच्या नावे PPF खाते उघडा, करातील सवलतीसह 51 लाखांपर्यंत फायदा मिळण्याची संधी

ठेवीवर मिळणाऱ्या व्याजापासून ते ठेव रकमेपर्यंत सर्व काही करमुक्त आहे. याखेरीज बायकोच्या नावावर खाते उघडल्यास त्यात आणखी सूट मिळत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:50 PM, 15 Apr 2021
पत्नीच्या नावे PPF खाते उघडा, करातील सवलतीसह 51 लाखांपर्यंत फायदा मिळण्याची संधी

नवी दिल्लीः सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ खाते (PPF Account) अल्प बचत योजनांपैकी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक लोकप्रिय योजना आहे. यामध्ये ठेवीवर मिळणाऱ्या व्याजापासून ते ठेव रकमेपर्यंत सर्व काही करमुक्त आहे. याखेरीज बायकोच्या नावावर खाते उघडल्यास त्यात आणखी सूट मिळत आहे. पीपीएफ खात्यासाठी पत्नी गृहिणी असो किंवा नोकरी करत असो, दोन्ही परिस्थितीत तिच्या नावे सहज गुंतवणूक करू शकता. त्यात गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित मानले जाते. हमी परतावा देणारी ही गुंतवणूक योजना देखील आहे. यात पत्नीच्या नावे खाते उघडल्यावर दीड लाखापर्यंतची रक्कम जमा करता येईल. (Open PPF Account in the Wife name, An Opportunity To Avail Benefits Up To Rs 51 Lakh With Tax Relief)

7.1% व्याज मिळतेय

पीपीएफवरील सध्याचा व्याजदर वार्षिक 7.1% आहे. यात वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याज जोडले जाते. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेते. पीपीएफमध्ये मोठ्या संख्येने लोकांची गुंतवणूक करत असताना किमतींमध्ये महत्त्वपूर्ण बदल होत नाही. एका वर्षात या खात्यात दीड लाखांहून अधिक रुपये जमा करता येणार नाहीत. एखादी व्यक्ती फक्त एक पीपीएफ खाते उघडू शकते. जरी या ठिकाणी आपण आपल्या मुलाच्या नावे म्हणजेच अल्पवयीन व्यक्तीचे खाते उघडले असल्यास त्यामध्ये संयुक्त खाते उघडले जाऊ शकत नाही. खाते चालू ठेवण्यासाठी वर्षाला किमान 500 रुपये जमा करावे लागतात.

51 लाखांचा निधी कसा बनवायचा

जर आपल्या पत्नीने पीपीएफमध्ये दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि जर ही गुंतवणूक 18 वर्षे केली तर एकूण ठेव सुमारे 27 लाख रुपये होते. यावेळी या योजनेत 7.1 टक्के व्याज मिळत आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला परिपक्वतेवर सुमारे 51 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे आपला निधी मोठ्या प्रमाणात जमा केला जातील.

संबंधित बातम्या

IIT च्या ‘या’ विद्यार्थ्याची अवघ्या 15 महिन्यांत 5000 कोटींची कमाई, पराक्रम पाहून भलेभले आश्चर्यचकित

अदानी ग्रुपचं मोठं पाऊल, 48 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार!

Open PPF Account in the Wife name, An Opportunity To Avail Benefits Up To Rs 51 Lakh With Tax Relief