आधार कार्डधारकांसाठी अलर्ट! UIDAI चा सतर्कतेचा इशारा, अन्यथा मोठं नुकसान…

पैसे घेऊन आधार कार्ड बनवणाऱ्या सेंटर ऑपरेटरच्या आमिषाला बळी पडू नका, असा सल्लाही UIDAIने दिला. Operators Are Appointed By Registrars, Says UIDAI

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:54 PM, 27 Nov 2020

नवी दिल्लीः आधार कार्ड (Aadhaar Card) जारी करणारी संस्था ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) ने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पैसे घेऊन आधार कार्ड बनवणाऱ्या सेंटर ऑपरेटरच्या आमिषाला बळी पडू नका, असा सल्लाही UIDAI ने दिला आहे. यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. आधार ऑपरेटर्स हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नव्हे, तर रजिस्ट्रार नियुक्त करतात. त्यामुळे आधार सेंटर ऑपरेटरच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने दिला आहे. (Operators Are Appointed By Registrars, Says UIDAI)

या क्रमांकावर तक्रार करा

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आधार ऑपरेटर UIDAI नव्हे, तर रजिस्ट्रार नियुक्त करतात. आधार सेंटर ऑपरेटर होण्यासाठी एखाद्याला त्याच्या क्षेत्रातील रजिस्ट्रारशी संपर्क साधावा लागतो. म्हणूनच जर कोणी तुमच्याकडे पैसे घेऊन आधार कार्ड बनवून देत असल्याचं सांगत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. अशी कोणतीही फसवणूक होत असल्यास तात्काळ 1947 क्रमांकावर कॉल करून तक्रार दाखल करा. Operators Are Appointed By Registrars, Says UIDAI


ऑपरेटर जास्त पैसे घेत असल्यास…

एका युजर्सला उत्तर देताना युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) म्हणाले की, कोणत्याही आधार नावनोंदणी एजन्सीने कोणत्याही प्रकारच्या आधार कार्ड बनवण्यासाठी निश्चित रकमेपेक्षा जास्त शुल्क मागितल्यास त्या एजन्सी / ऑपरेटरविरूद्ध तक्रारदेखील दाखल करू शकता. Https://resident.uidai.gov.in/file-complaint वर जाऊन नागरिक ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात. आधारशी संबंधित कोणत्याही सेवेसाठी किती शुल्क आहे आणि कोणती सेवा विनामूल्य आहे, याची माहितीसुद्धा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने वेबसाइटवर दिलेली आहे. Operators Are Appointed By Registrars, Says UIDAI

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दर पुन्हा एकदा स्वस्त; आतापर्यंत सोन्याचे भाव 8000 रुपयांनी घसरले

महिन्यातून एकदा पैसे भरा आणि दरमहा 36000 रुपये पेन्शन मिळवा, LIC ची जबरदस्त योजना