Indian Oil कडून 2 कोटीपर्यंत कमाईची संधी, फक्त ‘या’ नंबरवर करा मेसेज

या मोहिमेचे नाव आहे 'Diesel Bharo Inaam Jeeto'. ही मोहीम 4 एप्रिल रोजी सुरू करण्यात आली होती, जी 31 जुलैपर्यंत चालणार आहे. Indian Oil Offers 2 crore prizes

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:33 PM, 17 Apr 2021
Indian Oil कडून 2 कोटीपर्यंत कमाईची संधी, फक्त 'या' नंबरवर करा मेसेज
Indian Oil Offers

नवी दिल्लीः इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 2 कोटींचे बक्षीस जिंकण्याची संधी दिलीय. यासाठी Indian Oil तर्फे एक मोहीम राबवली जातेय. या मोहिमेचे नाव आहे ‘Diesel Bharo Inaam Jeeto’. ही मोहीम 4 एप्रिल रोजी सुरू करण्यात आली होती, जी 31 जुलैपर्यंत चालणार आहे. (Opportunity To Earn Up To Rs 2 Crore From Indian Oil, Just Message On This Number)

एकाच बिलात किमान 25 लिटर डिझेल भरावे लागेल

जर तुम्हालाही विजेता व्हायचे असेल तर एकाच बिलात किमान 25 लिटर डिझेल भरावे लागेल. यानंतर, आपल्याला एका नंबरवर संदेश द्यावा लागेल. त्याअंतर्गत प्रथम आपल्याला डीलर कोड टाईप करावा लागेल, स्पेस दिल्यानंतर बिल क्रमांक टाईप करा, नंतर आपल्याला किती डिझेल भरले आहे, ते 7799033333 या क्रमांकावर पाठवा. हे बिल आपल्याकडे ठेवावे लागेल हे लक्षात ठेवा. काही प्रश्न असल्यास 022-49192596 या हेल्पलाईन नंबरवर कॉल केला जाऊ शकतो.

मेसेज कसा टाईप करायचा

उदाहरणार्थ, जर डीलर कोड 123456 आणि बिल क्रमांक AB7890 असेल आणि ग्राहकाने 101 लिटर डिझेल घेतले असेल तर त्याने आपल्या मोबाईल नंबरवरून 123456 AB7890 101 टाईप करा आणि 7799033333 वर संदेश पाठवा. वेगवेगळ्या माहितीदरम्यान सिंग स्पेस टाकणे आवश्यक आहे. जर चूक झाली तर ग्राहकाला चुकीचे उत्तर मिळेल. असे असूनही काही अडचण असल्यास, 02249192596 वर कॉल करून माहिती मिळू शकते.

तुम्हाला बक्षीस कसे मिळेल ते जाणून घ्या

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, 4 ग्रँड फिनाले विजेत्यांना 2-2 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतील. 16 मासिक विजेत्यांना 75-75 हजार रुपये मिळतील. 70 पंधरवड्या विजेत्यांना (दोन आठवड्यांनी निवडलेले) 25-25 हजार रुपये मिळतील. 500 साप्ताहिक विजेत्यांना 1000-1000 रुपये मिळतील. Opportunity To Earn Up To Rs 2 Crore From Indian Oil, Just Message On This Number

संबंधित बातम्या

HDFC Bank ची चौथ्या तिमाहीत जोरदार कमाई, तीन महिन्यांत 8434 कोटी रुपयांचा नफा

…म्हणून कोरोना इतक्या वेगानं देशात पसरतोय, एम्सच्या संचालकांनी सांगितलं ‘कारण’

Opportunity To Earn Up To Rs 2 Crore From Indian Oil, Just Message On This Number