TWITTER UPDATE : सीईओ पराग अग्रवालांची गच्छंती अटळ? ट्विटरच्या संस्थापक म्हणतात, “……

TWITTER UPDATE : सीईओ पराग अग्रवालांची गच्छंती अटळ? ट्विटरच्या संस्थापक म्हणतात, ......
एलन मस्क
Image Credit source: Jnews

टेस्ला सर्वेसर्वा एलन मस्क यांच्याकडे मालकी जाण्याच्या चर्चेसोबत ट्विटरच्या खांदेपालटीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. एलन मस्क (ELON MUSK) यांच्याकडे ट्विटरची सूत्रे गेल्यानंतर सध्याचे ट्विटर सीईओ पराग अग्रवाल यांची उचलबांगडी होण्याची तंत्रज्ञान वर्तृळात चर्चा आहे

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 14, 2022 | 11:00 AM

नवी दिल्ली – ट्विटर-मस्क डील वरुन तंत्रज्ञान जगतात पडद्यामागे वेगवान घडामोडी आकाराला येत आहे. बनावट किंवा स्पॕम अकाउंट (SPAM-ACCOUNT) वरुन बहुचर्चित ब्लॉकब्लस्टर डीलला ब्रेकला लागला आहे. दरम्यान, टेस्ला सर्वेसर्वा एलन मस्क यांच्याकडे मालकी जाण्याच्या चर्चेसोबत ट्विटरच्या खांदेपालटीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. एलन मस्क (ELON MUSK) यांच्याकडे ट्विटरची सूत्रे गेल्यानंतर सध्याचे ट्विटर सीईओ पराग अग्रवाल यांची उचलबांगडी होण्याची तंत्रज्ञान वर्तृळात चर्चा आहे. ट्विटरचे सह-संस्थापक जॕक डोर्शी यांच्या एकामागोमाग एक ट्विटनंतर चर्चा जोर धरू लागल्या आहेत. ट्विटरच्या सीईओ (TWITTER CEO) पदाची सूत्रे पुन्हा स्विकारण्याबाबत डोर्शी यांना ट्विटरवरुन थेट विचारणा करण्यात आली होती.यावेळी डोर्शी यांनी संदिग्धता वर्तवित कुणीही सूत्रे स्विकारणार नसल्याचं म्हटलं आहे. येत्या काळात ट्विटरच्या नियंत्रणात विकेंद्रीकरण होणार असल्याचं म्हटलं जातय. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि अल्गोरिदमच्या सहाय्यानं ट्विटरचं नियंत्रण केले जाण्याची शक्यता यूजर्सने वर्तविली आहे.

अरबो डॉलरची उलाढाल-

एलन मस्क यांनी यांनी ट्विटर खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव सुरू केली आहे. आतापर्यंत 50 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. इतकचं नव्हे सौदी किंग यांनी मस्क यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवित 3.5 कोटी डॉलर देण्याची तयारी दर्शविली आहे. ट्विटर खरेदीचा व्यवहार 44 अरब डॉलरचा आहे.

ट्विटमय जग:

ट्विटर हे आघाडीचं सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट मानली जाते. ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करुन संवाद साधता येतो. ट्विटरवरील मजकुराला ट्वीट म्हटलं जातं. ट्विटरवर 280 अक्षरांपर्यंतची मर्यादा आहे. ट्विटरचा वापर 35 पेक्षा अधिक भाषांमध्ये केला जातो.ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्विट केले जातात. ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्विट केले जातात. ट्विटरच्या लोगोमधील पक्षी लैरी नावानं जगविख्यात आहे.

हे सुद्धा वाचा

‘फेक’ अकाउंटचं विघ्न: आघाडीचं समाजमाध्यम ट्विटर सध्या खरेदी व्यवहारावरुन चर्चेत आहे. जगातील श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचा सर्वेसर्वा एलन मस्कने ट्विटर खरेदीची घोषणा केली होती. दरम्यान, विक्री व्यवहार ट्विटरवरील बनावट अकाउंटमुळे लांबणीवर पडला आहे. ट्विटरवरील बनावट अकाउंटची संख्या एकूण वापरकर्त्यांच्या पाच टक्क्यांहून कमी असल्याचे सिद्ध झाल्याविना व्यवहार मार्गी लागणार नसल्याची भूमिका मस्क यांनी घेतली आहे. ट्विटरच्या खरेदीसाठी एलन मस्क यांनी विविध 19 गुंतवणुकदारांकडून 7 अरब डॉलर म्हणजे 50 हजार कोटी रुपयांची उभारणी केली आहे. ट्विटर खरेदी व्यवहार तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. स्पॅम किंवा बनावट अकाउंट कारणामुळे व्यवहाराला ब्रेक लावण्यात आल्याची माहिती मस्क यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें