Paytm चा लाखो ग्राहकांना इशारा! नवे डेबिट कार्ड मिळाल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…

डेबिट कार्ड मिळविण्यापूर्वी प्रथम मॅनेज कार्ड विभागात जा आणि कार्ड व्यवहाराची सेटिंग्ज बदला. आपण आपल्या कार्डवर कोणत्याही प्रकारच्या व्यवहारास परवानगी देऊ नका.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:32 PM, 2 Mar 2021
Paytm चा लाखो ग्राहकांना इशारा! नवे डेबिट कार्ड मिळाल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…
Paytm Payments Bank Alert

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन फसवणुकीची वाढती प्रकरण लक्षात घेता पेटीएम पेमेंट्स बँकेने कोट्यवधी ग्राहकांना डेबिट कार्ड सेफ्टीच्या सूचना दिल्यात. याबाबत पेटीएम पेमेंट्स बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केलेय. पेटीएम पेमेंट्स बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्वरित नवीन डेबिट कार्ड (Debit Card) मिळवा. आपण हे न केल्यास आपण फसवणुकीचे बळी ठरू शकता. पेटीएम पेमेंट्स बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, डेबिट कार्ड मिळविण्यापूर्वी प्रथम मॅनेज कार्ड विभागात जा आणि कार्ड व्यवहाराची सेटिंग्ज बदला. आपण आपल्या कार्डवर कोणत्याही प्रकारच्या व्यवहारास परवानगी देऊ नका. (Paytm Payments Bank Alert Things To Do As Soon As You Receive Your Debit Card)

या सुरक्षा टप्प्यांचे पालन करा

>> डेबिट कार्डची व्यवहार मर्यादा सेट करा.
>> पिन सेट करताना कोणीही पाहत नाही याची खात्री करून घ्या.
>> आपल्या कार्डचा पिन क्रमांक कोठेही लिहू नका, फक्त ते लक्षात ठेवा. आपण आपल्या पेटीएम अॅपवरून कधीही सहजपणे पिन बदलू शकता.
>> नवीन कार्डे मिळवण्यापूर्वी, जुने कार्ड शक्य तितक्या लवकर नष्ट करा.
>> ओटीपी, पिन किंवा आपल्या कार्डची इतर माहिती कोणाबरोबरही शेअर करू नका.
>> कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास आपल्या पेटीएम अ‍ॅपवरून कार्ड त्वरित बंद करा.

एटीएममधून ग्राहकांनी पैसे काढताना पेटीएमने कोणती खबरदारी घ्यावी?

पेटीएमच्या मते एटीएममधून पैसे काढताना तुमचा पिन कोणालाही दिसत नाही याची खात्री करून घ्या. एटीएम व्यवहारादरम्यान कोणालाही आत येऊ देऊ नका. पैसे काढल्यानंतर व्यवहार स्लिप घेणे विसरू नका. पेटीएम अ‍ॅपसह आपल्या कार्डचा पिन बदला.

संबंधित बातम्या

Car Loan: कार खरेदी करण्याच्या विचारात आहात; ‘या’ 10 बँका देतात स्वस्त कर्ज

Income tax Refund नाही आला? तात्काळ चेक करा ‘ही’ माहिती, वाचा सविस्तर

Paytm Payments Bank Alert Things To Do As Soon As You Receive Your Debit Card