मोठा धक्का! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ, जाणून घ्या…

पेट्रोल आणि डिझेलचे भाव पुन्हा भडकले. (Petrol Diesel Rates hike)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:07 AM, 24 Nov 2020

नवी दिल्लीः कोरोनाच्या काळात वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. आज दिल्लीत पेट्रोल 6 पैसे प्रतिलिटर महागले आहे. दिल्लीत पेट्रोलची नवीन किंमत प्रतिलिटर 81.59 रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात 16 पैसे प्रतिलिटर वाढ करण्याची घोषणा केली आहे. (Petrol Diesel Price Petrol Price Up By 6 Paisa And Diesel Rates By 16 Paisa Per Liter)

दिल्लीत आता डिझेलची किंमत प्रतिलिटर 71.41 रुपये करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढत असल्यानं वाहन चालकांना त्याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. कोरोनाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर दुचाकी आणि वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलचे दर अनुक्रमे 81.59 रुपये, 83.15 रुपये, 88.29 रुपये आणि 84.64 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. त्याचबरोबर चार महानगरांमध्ये डिझेलचे दर अनुक्रमे 71.41, 74.98 रुपये, 77.90 रुपये आणि 76.88 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढले आहेत. Petrol Diesel Price Petrol Price Up By 6 Paisa And Diesel Rates By 16 Paisa Per Liter

अशा प्रकारे पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल आणि डिझेलची दर माहिती करून घेऊ शकतो. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर बदलले जातात. इंडियन ऑयलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 नंबरवर मेसेज पाठवून दर पाहू शकतात आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 संदेश पाठवू शकतात आणि त्यांच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किमती जाणून घेऊ शकतात. Petrol Diesel Price Petrol Price Up By 6 Paisa And Diesel Rates By 16 Paisa Per Liter

Petrol Diesel Price Petrol Price Up By 6 Paisa And Diesel Rates By 16 Paisa Per Liter

संबंधित बातम्या

गुंतवणूक कुठे आणि कशी करावी?, स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी 5 सोप्या टिप्स

सरकारचा मोठा निर्णय! 10 हजार लोकांना नोकर्‍या मिळणार; भरघोस कमाईची संधी