पेट्रोल-डिझेल लवकरच महागणार, फक्त ‘या’ तारखेची वाट पाहा

निवडणुकीच्या शेवटी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 ते 3 रुपयांची वाढ होणार आहे. तसेच ही वाढ टप्प्याटप्प्याने करता येणार आहे. Petrol diesel prices

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:04 AM, 22 Apr 2021
पेट्रोल-डिझेल लवकरच महागणार, फक्त 'या' तारखेची वाट पाहा
Petrol diesel prices

नवी दिल्लीः विधानसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात आहेत. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बराच काळ कोणताही बदल झालेला नाही. आयएएनएसच्या अहवालानुसार, तेल कंपन्या निवडणूक संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत. निवडणुकीच्या शेवटी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol diesel prices) प्रति लिटर 2 ते 3 रुपयांची वाढ होणार आहे. तसेच ही वाढ टप्प्याटप्प्याने करता येणार आहे. (Petrol diesel prices will go up soon, just wait for this date)

मे महिन्यात किंमत वाढणार

पश्चिम बंगालमधील निवडणुकांचा शेवटचा टप्पा 29 एप्रिलला आहे. अशा परिस्थितीत मे महिन्यात किंमत वाढणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वेळी तेल कंपन्या पेट्रोलच्या प्रति लीटर 3 रुपये आणि डिझेलवर 2 रुपये तोटा सहन करत आहेत, परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किमती वाढविल्या जात नाहीत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची मागणी घटली आहे आणि त्यामुळे ते प्रति बॅरल 66 डॉलरच्या पातळीवर राहिले आहे.

27 फेब्रुवारीपासून किमतीत कोणताही बदल नाही

27 फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली नाही. मार्च आणि एप्रिलमध्ये त्याची किंमत चार वेळा कमी करण्यात आली. या कपातीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 77 पैसे आणि डिझेलच्या किमतीत 74 पैशांची घट झाली. फेब्रुवारी महिन्यात इंडियन बास्केटसाठी अव्हरेज क्रूड प्राईस 61.22 डॉलर प्रति बॅरल होती. मार्चमध्ये ते प्रति बॅरल 64.73 डॉलर होते, तर एप्रिलमध्ये आतापर्यंतची सरासरी किंमत 66 डॉलर आहे. पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ किंमत ही गेल्या 15 दिवसांतील सरासरी किरकोळ किंमत आहे.

29 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका होणार संपन्न

तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी येथे विधानसभा निवडणुका घेण्यात आल्यात, तर पश्चिम बंगालमधील शेवटचा टप्पा 29 एप्रिलला पार पडणार आहे. 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तेल कंपन्यांनी मार्चच्या सुरुवातीलाच दरवाढ न करता लाभ घेतला नाही. 24 आणि 25 मार्च रोजी सलग दोन दिवस किमतीतही कपात करण्यात आली.

संबंधित बातम्या

क्रेडिट कार्डावर कर्ज घेताय, मग ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठा तोटा

Gold Silver Price Today : आठवड्याभरात सोनं 1000 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरातही तेजी, झटपट वाचा ताजे दर

Petrol-diesel prices will go up soon, just wait for this date