PhonePe ची जबरदस्त ऑफर, आता ग्राहकांना पेट्रोल भरण्यावर मिळणार कॅशबॅक

खरं तर PhonePe ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी ऑफर दिलीय. ज्यामध्ये तुम्हाला पेट्रोल भरण्यावर कॅशबॅक मिळेल. phonepe cashback petrol filling

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:26 PM, 17 Apr 2021
PhonePe ची जबरदस्त ऑफर, आता ग्राहकांना पेट्रोल भरण्यावर मिळणार कॅशबॅक
phonepe cashback petrol filling

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटातही पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत. यामुळे लोकांचे बजेट बिघडू लागलेय. जर आपणही पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण असाल तर आपल्यासाठी दिलासादायक बातमी आहे. खरं तर PhonePe ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी ऑफर दिलीय. ज्यामध्ये तुम्हाला पेट्रोल भरण्यावर कॅशबॅक मिळेल. हे आपल्या खिशातील ओझे कमी करेल. (PhonePe great offer, now customers will get cashback on petrol filling)

इंडियन ऑईल कंपनीने भरलेल्या पेट्रोलवर ही कॅशबॅक सुविधा उपलब्ध

PhonePe अ‍ॅपवर उपलब्ध माहितीनुसार, इंडियन ऑईल कंपनीने भरलेल्या पेट्रोलवर ही कॅशबॅक सुविधा उपलब्ध असेल. यात तुम्हाला 0.75 टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे. या कॅशबॅकची मर्यादा प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त 45 रुपये आहे. ही ऑफर 30 जूनपर्यंत आहे. अशा परिस्थितीत, जर आपण आतापासून त्याचा फायदा घेतल्यास आपण 3 महिन्यांत चांगली बचत करू शकता.

कॅशबॅक कसा मिळवायचा?

कॅशबॅक मिळविण्यासाठी प्रथम पेट्रोल पंपावर इंधन भरा. बिलिंगसाठी आता मोबाईलमध्ये आपला PhonePe अॅप वापरा. पेट्रोल पंपावर देण्यात येणारा PhonePe क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट मोड निवडा आणि पेमेंट करा, तुम्हाला पैसे भरल्यानंतर 24 तासांत कॅशबॅक मिळेल. हे आपल्याला PhonePe गिफ्ट व्हाऊचर बॅलन्सच्या स्वरूपात मिळेल. आपण ते रिचार्ज किंवा बिल पेमेंट इत्यादीमध्ये वापरू शकता.

क्रेडिट कार्डवर कोणताही लाभ मिळणार नाही

कॅशबॅकचा फायदा केवळ निवडक पेमेंट पर्यायांवर उपलब्ध असेल. जर आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे दिले तर आपल्याला या ऑफरचा लाभ मिळणार नाही. कॅशबॅक फक्त आपल्या वॉलेटद्वारे केलेल्या व्यवहाराच्या आधारे दिले जाईल. PhonePe great offer, now customers will get cashback on petrol filling

संबंधित बातम्या

सर्वात जास्त पैसे जमा असलेली पीएफची 5 खाती; एकामध्ये 100 कोटींपेक्षा जास्त शिल्लक

LPG गॅस सिलिंडरचा चेहरामोहरा बदलणार; असा दिसणार, पाहा फोटो

phonepe cashback offer on petrol for its customers you can save money know benefits