30 वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचार्‍यांना शासन देणार 120000 रुपये; नेमकं सत्य काय?

व्हायरल झालेल्या मेसेजनुसार, एका संकेतस्थळाने कामगार आणि रोजगार मंत्रालय 1990 ते 2021 पर्यंत काम केलेल्या कर्मचार्‍यांना 1.20 लाख रुपये देत असल्याचा दावा केलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:22 PM, 24 Feb 2021
30 वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचार्‍यांना शासन देणार 120000 रुपये; नेमकं सत्य काय?
irda claim settlement ratio 2019-20 term insurance

नवी दिल्लीः सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. पण व्हायरल होणाऱ्या सर्व गोष्टी या खऱ्या नसतात. सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 30 वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांना सरकार 1,20,000 रुपये देत असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. व्हायरल झालेल्या मेसेजनुसार, एका संकेतस्थळाने कामगार आणि रोजगार मंत्रालय 1990 ते 2021 पर्यंत काम केलेल्या कर्मचार्‍यांना 1.20 लाख रुपये देत असल्याचा दावा केलाय. (PIB Fact Check ministry of labour and employment is giving rs 120000 to employees)

भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबीवर खुलासा

परंतु प्रत्यक्षात असे काहीही घडत नाही आणि ही बातमी बनावट आहे. भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबीवर खुलासा केलाय. फॅक्ट चेकच्या माध्यमातून पीआयबीनं या मेसेजची पोलखोल केलीय. म्हणून अशा बातम्यांपासून दूर राहा, नाहीतर आपणास मोठे नुकसान होऊ शकते, असा सल्लाही पीआयबीनं दिलाय.

रोजगार मंत्रालयाकडून 1,20,000 रुपये मिळविण्याचा अधिकार

1990 ते 2021 पर्यंत काम केलेल्या कर्मचार्‍यांना कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 1,20,000 रुपये मिळविण्याचा अधिकार आहे. पैसे मिळविण्यासाठी आपण आपले नाव वेबसाईटवर तपासू शकता. 1.20 लाख रुपये काढण्यासाठी तीन सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, असं संबंधित साईट्सने मेसेजमध्ये म्हटले आहे.

पीआयबी फॅक्ट चेकमध्ये (PIB Fact Check)ही व्हायरल पोस्ट बनावट

पीआयबी फॅक्ट चेकमध्ये (PIB Fact Check)ही व्हायरल पोस्ट बनावट असल्याचे आढळले आहे. पीआयबीने लिहिले की, हा दावा खोटा आहे. कामगार मंत्रालयाने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

आपणही करू शकता फॅक्ट चेक

आपणासही असा संदेश मिळाल्यास आपण https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर फॅक्ट चेकसाठी पीआयबीला पाठवू शकता. ही माहिती पीआयबी वेबसाईट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

आता पोस्टाच्या बचत योजनाही खासगी बँकेत उपलब्ध होणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

प्राप्तिकर विभागाकडून 1.93 कोटी करदात्यांना कोट्यवधींचा कर परतावा जाहीर; आताच चेक करा

PIB Fact Check ministry of labour and employment is giving rs 120000 to employees