PM SVAnidhi Yojana: विनातारण 10 हजारांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

जे लोक रस्त्यावर दुकानं थाटून  आणि कामधंदा करून उपजीविका चालवतात, त्यांच्यासाठी मोदी सरकारची ही योजना खूप फायदेशीर ठरत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:59 PM, 27 Oct 2020
नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी सरकारला मोठं यश आलं आहे. भारतात बेरोजगारी दर वाढत असल्यामुळे वारंवार मोदी सरकारवर टीका केली जात होती. पण विरोधकांच्या त्याच कळीच्या मुद्द्यावर मोदी सरकारला मोठं यश आलं आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशच्या ‘प्रधानमंत्री स्वानिधी योजने’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. जे लोक रस्त्यावर दुकानं थाटून  आणि कामधंदा करून उपजीविका चालवतात, त्यांच्यासाठी मोदी सरकारची ही योजना खूप फायदेशीर ठरत आहे. (pm svanidhi scheme how to get pm svanidhi yojna loan street vendor loan)

कोरोना काळात रस्त्याच्या कडेला दुकान लावून सामान विकणाऱ्यांच्या उदरनिर्वाहावर लॉकडाऊनमुळे विपरीत परिणाम झाला. त्यांना दिलासा देण्यासाठीच मोदी सरकारनं ही योजना आणली आहे. सरकार अशा गरजूंना पुन्हा व्यवसाय करण्यासाठी कर्ज देत आहे. हे कर्ज परवडणार्‍या दरावर उपलब्ध होत आहे. सरकारच्या या कर्ज योजनेला पंतप्रधान स्वानिधी योजना असे नाव देण्यात आले आहे.

विना तारणाशिवाय मिळते कर्ज

रस्त्याच्या कडेला बसून सामान विकणारे दुकानदारांना या योजनेंतर्गत लाभ मिळावा आणि लॉकडाऊनमुळे अडगळीत गेलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोदी सरकारकडून हे प्रयत्न केले जात आहेत. कोरोना व्हायरस साथीनं पीडित, रस्त्यावर माल विक्री करणा-या गरीब लोकांसाठी 1 जून 2020ला पंतप्रधान स्वानिधी योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे हे कर्ज मिळवण्यासाठी कोणतीही वस्तू तारण म्हणून ठेवावी लागत नाही.

अशा प्रकारे रस्त्यावर विक्रेत्यांना मिळतो फायदा

या योजनेंतर्गत पथ विक्रेत्यांना 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. यामुळे त्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात मदत मिळणार आहे. याअंतर्गत दुकानदार, सलून, चप्पलाचे दुकानदार, पानटपरी, लाँड्री यांसारख्या दुकानदारांचा समावेश आहे. यामध्ये भाजीपाला, फळे, चहा, ब्रेड, अंडी, कपडे, हस्तकलेची व कार्टवरील पुस्तके/प्रती विकणार्‍या दुकानदारांचा समावेश आहे.

तुम्हाला 10 हजारांचे कर्ज कसे मिळेल?

> दुकानदाराने प्रथम सरकारी योजनेच्या अधिकृत वेबसाइट http://pmsvanidhi.mohua.gov.in/ वर भेट दिली पाहिजे.
> वेबसाइटच्या पहिल्या पानावर ‘कर्जासाठी अर्ज करण्याची योजना?’ चा पर्याय दिसेल.
> अर्जदाराने ते काळजीपूर्वक वाचले पाहिजे. यानंतर ‘व्ह्यू मोअर’ या पर्यायावर क्लिक करा.
> त्यानंतर अर्जदाराला ‘व्ह्यू / डाऊनलोड फॉर्म’ वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर फॉर्म कर्ज योजनेसाठी उघडेल.
> तो फॉर्म डाऊनलोड करावा आणि त्यानंतर भरावा, सर्व आवश्यक कागदपत्रांसह तो फॉर्म शासकीय अधिकृत कार्यालयात जमा करावा लागेल.

पीएम स्वानिधी योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना अनुदानाच्या स्वरूपात 10 हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल मिळणार आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार या योजनेंतर्गत आतापर्यंत 24 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत, उत्तर प्रदेशातील विक्रेत्यांकडून आलेले 557,000 अर्ज देशभरातील सर्वाधिक आहेत. यूपीमधून तब्बल 3.27 लाख अर्ज मंजूर झाले असून 1.87 लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे. एकूण अर्जांपैकी 12 लाख मंजूर झाले असून, सुमारे 5.35 लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

संबंधित महत्त्वाची बातमी

PM SVANidhi Scheme : फेरीवाल्यांसाठी केंद्राची मोठी योजना, 3 लाख पथ विक्रेत्यांना कर्जवाटप

मजुरांना 2 महिने मोफत धान्य, कमी भाड्यात घर, फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटी

वन नेशन वन रेशन कार्ड, शहरी मजुरांना कमी भाड्यात घर