पंजाब नॅशनल बँकेसह तीन बँका एकत्र येणार, अनेक नियमांमध्ये बदल

पंजाब नॅशनल बँक (PNB), युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) या तीन बँकांचं विलिनीकरण (Merged entity of UBI, PNB, OBC) करण्यात येणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेसह तीन बँका एकत्र येणार, अनेक नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (PNB), युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) या तीन बँकांचं विलिनीकरण (Merged entity of UBI, PNB, OBC) करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 1 एप्रिल 2020 या तिन्ही बँकांच्या कामकाज एकत्रितरित्या चालणार आहे. मात्र बँकांच्या (Merged of three banks) विलिनीकरणानंतर बँकाच्या ग्राहकांना काही बदलांना सामोरे (Merged entity of UBI, PNB, OBC Bank) जावं लागू शकते.

अकाऊंट नंबरमध्ये बदल

या बँकांच्या विलीनकरणानंतर ग्राहकांना नवीन खाते क्रमांक आणि कस्टमर आयडी मिळू शकतो. यासाठी तुमच्या बँकांमध्ये तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अपडेट असणे गरजेचे आहे. जर तुमच्या खाते क्रमांक किंवा कस्टमर आयडीमध्ये कोणताही बदल झाला, तर बँका तुम्हाला लगेच त्याबाबत कळवू शकते.

चेक बुकही बदलणार

बँकांच्या विलिनीकरणानंतर तुमचे चेक बुकही बदलले जाणार आहे. या तिन्ही बँकांच्या विलिनीकरणामुळे जुन्या बँकांच्या चेकबुकचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही. त्याऐवजी बँकांकडून तुम्हाला नवीन चेकबुक दिले जाईल. मात्र यासाठी ग्राहकांना काही दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे.

विविध ठिकाणी बँकांचे तपशील बदलणार

विलिनीकरणानंतर बँकेतील ग्राहकांना अकाऊंट नंबर आणि IFSC या माहितीत बदल होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना इन्कम टॅक्स, म्यूच्युअल फंड, इन्शुअरन्स कंपनी यासह विविध तपशील मध्ये बदल करावा लागणार आहे.

ब्राँचही बदलणार

बँकाच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या बँकाची संबंधित ठिकाणी एकच बँक असणार आहे. जर एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्त बँकांच्या शाख असतील, तर त्या एकत्रित करण्यात येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या बँकांच्या शाखांचा पत्ता बदलू शकतो.

FD आणि RD वरही परिणाम

बँकांच्या एकत्रिकरणामुळे विविध ठेवींवर याचा परिणाम होऊ शकतो. सद्यस्थितीत तुमच्या एफडी आणि आरडीवर मिळणारा व्याजदरावर कोणताही फरक पडणार नाही. मात्र त्यानंतर बँकांच्या एफडी आणि आरडी यासारख्या ठेवींचा व्याजदर बदलू शकतो.

व्याजदार बदल नाही

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे तुम्ही जर गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज यासारखे कर्ज घेतली असाल, तर तुमच्या व्याजदरात कोणताही बदल होणार नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *