बँकेच्या खातेदारांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकेच्या ATM मधून पैसे काढता येणार नाहीत

आपण ईएमव्ही नसलेल्या मशिनमधून पैसे काढू शकणार नाही. पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:29 PM, 22 Jan 2021
बँकेच्या खातेदारांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून 'या' बँकेच्या ATM मधून पैसे काढता येणार नाहीत

नवी दिल्ली: देशभरातील वाढत्या एटीएम घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने मोठे पाऊल उचललेय. जर तुमचेही पीएनबीकडे खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 1 फेब्रुवारी 2021 पासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमवी एटीएम (Non-EMV ATM) मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत. म्हणजेच आपण ईएमव्ही नसलेल्या मशिनमधून पैसे काढू शकणार नाही. पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिलीय. (PNB Will Be Restricting Transactions From Non Emv Atm Machines From 1 Feburary 2021)

पीएनबीने केले ट्विट

पंजाब नॅशनल बँकेने ट्विट केले की, आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी पीएनबी ईएमव्ही नसलेल्या एटीएम मशीनमधून 01.02.2021 पासून व्यवहार करण्यापासून बंदी घालेल.

ईएमव्ही मशीनशिवाय व्यवहार करू शकणार नाही

बँकेने म्हटले आहे की, वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता पीएनबीने हे पाऊल उचललेय. जेणेकरून ग्राहकांचे पैसे सुरक्षित असतील. 1 फेब्रुवारीपासून ईएमव्हीशिवाय ग्राहक एटीएममधून आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत.

EMV नॉन एटीएम म्हणजे काय?

EMV नॉन एटीएम असे असतात, ज्यात व्यवहाराच्या वेळी एटीएम कार्ड मशीनमध्ये जास्त काळ ठेवावे लागत नाहीत. यात डेटा चुंबकीय पट्टीद्वारे वाचला जातो. याशिवाय EMV एटीएममध्ये व्यवहार होईपर्यंत काही सेकंदांसाठी कार्ड लॉक स्वरूपात ठेवावे लागते.

बँकेनं नुकतीच ही सुविधा दिली

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना पीएनबीने अ‍ॅपद्वारे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड चालू/बंद करण्याची सुविधा दिली आहे. आपण आपले कार्ड न वापरल्यास आपण ते बंद करू शकता. असे केल्याने आपल्या बँक खात्यात ठेवलेले आपले पैसे सुरक्षित राहतील.

संबंधित बातम्या

देशातील ‘या’ तीन बँकांमध्ये तुमचे पैसे आहेत? RBI चं मोठं वक्तव्य

PNB Will Be Restricting Transactions From Non Emv Atm Machines From 1 Feburary 2021