थेंबे थेंबे तळे साचे, मुलांच्या नावे दररोज 166 रुपयांची गुंतवणूक, 15 वर्षांत बक्कळ रक्कम

पीपीएफ ही एक छोटी बचत योजना आहे जी शासनाद्वारे चालवली जाते. हा फंड 15 वर्षांत परिपक्व होतो.

थेंबे थेंबे तळे साचे, मुलांच्या नावे दररोज 166 रुपयांची गुंतवणूक, 15 वर्षांत बक्कळ रक्कम

नवी दिल्लीः मुलाच्या नावावर काही तरी रक्कम जमा असावी, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. जेणेकरून त्याच्या शिक्षणासाठी त्या पैशांचा उपयोग होऊ शकेल. आपल्यालाही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असल्यास आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) मध्ये गुंतवणूक करू शकता. (Start Investing in Public Provident Fund PPF by Child’s name to create big fund after 15 years)

पीपीएफ ही एक छोटी बचत योजना आहे जी शासनाद्वारे चालवली जाते. हा फंड 15 वर्षांत परिपक्व होतो. पीपीएफवर सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना EEE प्रकारात मोडते. योजनेत केलेल्या संपूर्ण गुंतवणुकीवरही कर सवलतीचा लाभ मिळतो. याव्यतिरिक्त व्याज आणि परिपक्वतापासून मिळणा-या उत्पन्नावर कर सवलत देण्याचे देखील फायदे आहेत.

जर आपण मुलांच्या वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांच्या नावावर पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर मुलं 25 वर्षांची होईपर्यंत पीपीएफही मॅच्युअर होईल. या योजने अंतर्गत महिन्याला केवळ एक हजार रुपये गुंतवून तुम्ही 15 वर्षात सुमारे 3.20 लाख रुपयांचा निधी तयार करु शकता. म्हणजेच तुम्ही पंधरा वर्षांत एक लाख 80 हजारांची गुंतवणूक करुन तीन लाख 20 हजारांचा फंड जमा करु शकता. तर तुम्ही महिन्याला 2 हजार रुपये गुंतवणूक करुन 15 वर्षात सुमारे 6.40 लाख रुपयांचा निधी तयार करु शकता.

15 वर्षांनंतर गुंतवणूक सुरु ठेवण्याचे बंधन नाही

15 वर्षांनंतर आवश्यकता असल्यास मुलं खात्यातून पैसे काढू शकतील, किंवा तातडीने गरज नसेल तर पीपीएफ 5 वर्षांसाठी वाढवू शकता. पुढील पाच वर्षांसाठी यात गुंतवणूक सुरु ठेवणे आवश्यक नाही. अधिक गुंतवणूक न करताही आपल्या ठेवीवर 7.1 टक्के व्याज मिळणे सुरु राहील. मुलं 30 वर्षांची झाल्यावर ते पैसे काढू शकतात. तेव्हाही त्यांना पैशांची गरज नसेल, तर आणखी पाच वर्षांसाठी ही मुदत वाढवता येऊ शकते.

166 रुपयांची गुंतवणुकीवर 16 लाखांपेक्षा अधिक फायदा

जर तुम्ही पीपीएफमध्ये दररोज 166 रुपये किंवा एका महिन्यात 5,000 रुपये जमा केले तर 15 वर्षांत तुमची गुंतवणूक 16.27 लाख होतील. 15 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 9 लाख रुपये होईल, तर 7.27 लाख रुपये व्याज मिळेल.

केवळ पाचशे रुपयात खाते उघडा

पीपीएफ खाते उघडण्यासाठी लागणारी किमान रक्कम 500 रुपये आहे. आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे, तर जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा वर्षाकाठी 1.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

कर सवलतीचा लाभ

पीपीएफ ‘EEE ’च्या श्रेणीत येते. म्हणजेच तुम्हाला या योजनेत केलेल्या संपूर्ण गुंतवणूकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. तसेच या योजनेतील गुंतवणुकीपासून त्यावर मिळणाऱ्या संपूर्ण व्याजाच्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही. पीपीएफ गुंतवणुकीवरील व्याजदर प्रत्येक तीन महिन्यांनी बदलत असतात.

कर्जही काढण्याची सुविधा

तुम्ही पीपीएफ खात्यावर जमा रकमेवर कर्जही घेऊ शकता. आपण पीपीएफ खाते उघडले त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर एका आर्थिक वर्षापासून ते पाचव्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पीपीएफकडून कर्ज घेण्याचे आपल्याला अधिकार आहेत. जर आपण जानेवारी 2017 मध्ये पीपीएफ खाते उघडले असेल तर आपण 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2022 पर्यंत कर्ज घेऊ शकता. ठेवीवर तुम्ही जास्तीत जास्त 25% कर्ज घेऊ शकता.

पीपीएफ खाते कोणत्याही न्यायालय किंवा आदेशाद्वारे कर्ज किंवा इतर उत्तरदायित्वाच्या वेळी जप्त करणे शक्य नाही. पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत स्वत: च्या नावाने किंवा एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने उघडले जाऊ शकते. नियमांनुसार पीपीएफ खाते हिंदू अविभाजित कुटुंबाच्या (एचयूएफ) नावे उघडता येत नाही.

(कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या कर सल्लागारासोबत चर्चा करा)

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

संबंधित बातम्या :

PPF नियमांमध्ये बदल, खातेधारकांना महत्त्वाच्या पाच सूचना

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *