Post Office Saving Schemes: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 9 जबरदस्त बचत योजना; चांगल्या व्याजासह भरघोस परतावा

या योजनांना केंद्र सरकारने पाठिंबा दर्शविला आहे. यापैकी काही बचत योजनांना भारतीय आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत आयकरात सूट देखील मिळते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:29 PM, 22 Feb 2021
Post Office Saving Schemes: पोस्ट ऑफिसच्या 'या' 9 जबरदस्त बचत योजना; चांगल्या व्याजासह भरघोस परतावा
India Post GDS Recruitment 2021

नवी दिल्ली: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना काही लहान बचत योजनांमध्ये (Small saving schemes) गुंतवणूक करण्याची संधी देत असते. या ठेव योजना सुरक्षित, चांगल्या आणि हमी परताव्यासाठी प्रसिद्ध आहेत. या योजनांना केंद्र सरकारने पाठिंबा दर्शविला आहे. यापैकी काही बचत योजनांना भारतीय आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत आयकरात सूट देखील मिळते. या ठेव योजनांचा व्याजदर दर तीन महिन्यांनी सरकार ठरवते. या बचत योजनांवरील सध्याच्या व्याजदराबद्दल माहिती जाणून घेऊयात. (Post Office Saving Schemes: Post Office Know These 9 Saving Schemes; good return with good interest)

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

नियमित व्याज उत्पन्न मिळविण्यासाठी 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेतील किमान गुंतवणुकीची रक्कम एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीची रक्कम 15 लाख रुपये आहे. सध्या या योजनेत ग्राहकांना 7.40 टक्के व्याज मिळत आहे.

सुकन्या समृद्धी योजना (sukanya samriddhi yojana)

या योजनेत गुंतवणुकीची रक्कम, मिळवलेली व्याज रक्कम आणि मॅच्युरिटी रक्कम या तिन्हीमध्ये आयकरात सूट मिळते. पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या सुकन्या समृद्धी योजनेत जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडू शकतात. या योजनेंतर्गत आर्थिक वर्षातील किमान गुंतवणुकीची रक्कम 250 रुपये आहे आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीची रक्कम 1.50 लाख रुपये आहे. सध्या या योजनेवर 7.60 टक्के दराने व्याज मिळत आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

पीपीएफमध्येही गुंतवणुकीची रक्कम, मिळवलेली व्याज रक्कम आणि मॅच्युरिटी रक्कम ही तिन्हीमध्ये आयकरात सूट आहे. या योजनेचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा आहे, परंतु सात वर्षांनंतर अंशतः पैसे काढू शकतो. या योजनेतील गुंतवणुकीची किमान गुंतवणूक रक्कम आर्थिक वर्षात 500 रुपये आणि कमाल गुंतवणुकीची रक्कम 1.50 लाख रुपये आहे. या योजनेवर व्याजदर सध्या वार्षिक 7.10 टक्के आहे.

पोस्ट ऑफिस आरडी

नियमित अंतराने काही प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी ही योजना आखली गेली आहे. ग्राहक पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांचे आरडी खाते उघडू शकतात. या योजनेत गुंतवणुकीची किमान मर्यादा 100 रुपये मासिक आणि जास्तीत जास्त गुंतवणूक रकमेला कोणतीही मर्यादा नाही. या योजनेवर सध्या वार्षिक 5.80 टक्के व्याज मिळते.

पोस्ट ऑफिस बचत खाते

कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये त्यांचे बचत खाते उघडू शकते. हे बँकेत उघडलेल्या बचत खात्यासारखे आहे. सध्या या खात्यावर 4 टक्के दराने व्याज जमा केले जात आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. कलम 80 सी अंतर्गत प्राप्तिकरात सूट देखील उपलब्ध आहे. या योजनेत किमान गुंतवणूक रक्कम 1000 आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या रकमेला कोणतीही मर्यादा नाही. ही योजना सध्या वार्षिक 6.80 टक्के व्याजदर देत आहे.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

ही योजना केवळ गुंतवणूकदारांना मासिक स्वरूपात व्याज देते. या योजनेतील किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये आहे आणि एका खात्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा 4.50 लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी 9 लाख रुपये आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. सध्या या योजनेतील व्याज 6.60 टक्के आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते.

किसान विकास पत्र (KVP)

किसान विकास पत्रात गुंतवणूक करून गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करू शकतात. या योजनेत व्याजदर आणि गुंतवणुकीच्या रकमेवरील परतावा तिमाही आधारावर निश्चित केला जातो. या योजनेत किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेचा व्याजदर सध्या 6.90 टक्के आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. सध्या या योजनेत 124 महिने म्हणजेच 10 वर्षे 4 महिन्यांसाठी गुंतवलेली रक्कम दुप्पट होते.

पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉजिट

पोस्ट ऑफिस देखील बँक एफडीप्रमाणेच ग्राहकांकडून टाइम डिपॉजिटची सुविधा देते. हे एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठी असते. या योजनेतील किमान गुंतवणुकीची रक्कम 1000 रुपये आहे आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. या योजनेत व्याज 5.50 ते 6.70 टक्के दराने मिळणार आहे. योजनेतील व्याज तिमाही आधारावर मोजले जाते, परंतु परतावा वार्षिक आधारावर दिला जातो. Post Office Saving Schemes: Post Office Know These 9 Saving Schemes; good return with good interest

संबंधित बातम्या

Good Return: 124 महिन्यांत पैसे थेट दुप्पट; सरकारची जबरदस्त योजना

पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्किम : बचतीवरील करामध्ये मिळते अधिक सवलत

Post Office Saving Schemes: Post Office Know These 9 Saving Schemes; good return with good interest