नवी दिल्लीः पोस्ट खात्यानं (Post Office)एक महत्त्वपूर्ण घोषणा केलीय. ही घोषणा पोस्ट कार्यालयाच्या बचत खात्यातील किमान शिल्लक रकमेसंदर्भातील आहे. आता बचत खात्यात किमान रक्कम किती ठेवावी लागेल यासंदर्भात टपाल खात्याने माहिती दिलीय. आतापर्यंत आपल्याला बँकांमधील बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागत होती. आता ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यासाठीही हा नियम लागू करण्यात आलाय. किमान रकमेच्या स्वरूपात पैसे ठेवणे अनिवार्य करण्यात आलंय. (Post Office Savings Account Maintain Minimum Balance Rs 500 Or Pay Fine)
पोस्टल विभागाच्या म्हणण्यानुसार, बचत खातेदारांना महिन्यात किमान 500 रुपये ठेवणे आवश्यक आहे. किमान शिल्लक रकमेचा नियम 11 डिसेंबरपासून लागू करण्यात आला आहे. जर ही रक्कम ठेवली नाही, तर खातेदाराच्या खात्यातून 100 रुपये देखभाल शुल्क आणि जीएसटी जोडून वजा केले जाणार आहेत.
– किमान ठेव रक्कम 500 रुपये असावी.
– किमान पैसे काढण्याची रक्कम 50 रुपये.
– जास्तीत जास्त ठेव रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
आता खात्यात 500 रुपयांहून कमी रक्कम असल्यास अशा खातेदारांना पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
– आर्थिक वर्षात खात्यात 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा न झाल्यास देखभाल शुल्काच्या नावाखाली 100 रुपयांची कपात केली जाईल. संपूर्ण आर्थिक वर्षात ठेव शून्य रुपये राहिल्यास खाते बंद करण्यात येईल.
– व्याजदर किमान शिल्लक रकमेच्या आधारावर निश्चित केले जाईल आणि त्याचा कालावधी महिन्याच्या 10 व्या तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत असेल.
– जर खात्यात किमान शिल्लक रक्कम महिन्याच्या 10 तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 500 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर व्याज दिले जाणार नाही.
– अर्थमंत्र्यांच्या सूचनेनुसार व्याजदर निश्चित केले जाणार असून, तो आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात जमा होईल.
– प्राप्तिकर कलम 80TT अंतर्गत सर्व बचत खात्यांवरील 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही कर आकारला जाणार नाही.
– जर आपण सलग 3 वर्षे सेव्हिंग बँक खात्यातून पैसे काढले नाहीत किंवा पैसे जमा केले नाहीत, तर ते निष्क्रिय खाते म्हणून समजले जाईल. असे खाते पुन्हा सुरू करण्यासाठी केवायसी करावे लागेल. त्यांच्या संबंधित पोस्ट ऑफिसमधून पासबुकचे नूतनीकरण करावे लागेल.
Now maintaining minimum balance in Post Office Savings Account is mandatory.#MyPostIndiaPost pic.twitter.com/ZLDkEpIYts
— India Post (@IndiaPostOffice) December 10, 2020
– प्रत्येक व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये एकच खाते उघडू शकते. बचत खात्यावर 4% व्याज मिळते.
– एकल व्यक्ती एकल किंवा संयुक्त खाते म्हणून बचत खाते उघडू शकते.
– दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलं, मानसिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनाही खाते उघडता येते.
पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सुविधा उपलब्ध आहे. इंटरनेट बँकिंग ही बँकांप्रमाणेच एक पद्धत आहे. इंटरनेट बँकिंगसाठी प्रथम आपल्याला इंडिया पोस्ट इंटरनेट बँकिंगवर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर नेव्हिगेट अकाउंट्स पर्यायावर क्लिक करा. नंतर शिल्लक आणि व्यवहार माहितीवर क्लिक करा. त्यानंतर बचत खात्यावर जा. आता माय ट्रान्झॅक्शन पर्यायावर क्लिक करा. शेवटी आपला तपशील डाऊनलोड करा.
संबंधित बातम्या
‘या’ अॅपच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस RD अकाऊंटमध्ये जमा करा ऑनलाईन पैसे; घरबसल्या होणार काम
महिन्याला फक्त 1000 रुपये गुंतवा आणि मिळवा बक्कळ पैसा, खास आहे पोस्टाची योजना
Post Office Savings Account Maintain Minimum Balance Rs 500 Or Pay Fine