Railways Special Trains List: मुंबई, पुण्यातून परराज्यात जाणाऱ्यांसाठी ‘या’ विशेष गाड्या, एका क्लिकवर संपूर्ण लिस्ट

अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मुंबई, पुण्यासारख्या महानगरातून परप्रांतीयांसमोर रोजीरोटीचे संकट उभं राहिलंय. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक स्थलांतर करत आहेत. Railways Special Trains List

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:52 PM, 14 Apr 2021
Railways Special Trains List: मुंबई, पुण्यातून परराज्यात जाणाऱ्यांसाठी 'या' विशेष गाड्या, एका क्लिकवर संपूर्ण लिस्ट
Railways Special Trains List

नवी दिल्लीः महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात कडक निर्बंध लादलेत. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्यात आलाय. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मुंबई, पुण्यासारख्या महानगरातून परप्रांतीयांसमोर रोजीरोटीचे संकट उभं राहिलंय. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक स्थलांतर करत आहेत. (Railways Special Trains List: Special Trains for other states people from Mumbai, Pune)

मुंबई आणि पुण्याहून पूर्व मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर अनेक विशेष गाड्या

दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई आणि पुण्याहून पूर्व मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर अनेक विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. त्याशिवाय पूर्वेकडून धावणाऱ्या विशेष गाड्यांचा ऑपरेटिंग कालावधीही वाढविण्यात आलाय. पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार म्हणाले की, सर्व विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित प्रवर्गात आहेत. त्यांनी प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करताना कोविड 19 प्रोटोकॉलचे पालन करण्याची विनंती केलीय.

01153/01154 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-दानापूर विशेष:

ट्रेन क्रमांक 01153 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-दानापूर स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 17, 21, 24 आणि 28 एप्रिल रोजी रात्री 00.25 वाजता सुटून, दुसर्‍या दिवशी दुपारी 02.15 वाजता पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शन, 03.10 वाजता बक्सर, 05.35 वाजता दानापूर येथे पोहोचेल. तसेच परतीची ट्रेन 01154 दानापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल 18, 22, 25 आणि 29 एप्रिल रोजी सकाळी 08.30 वाजता सुटून 09.58 वाजता बक्सर, 11.50 वाजता पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शनला थांबेल, पुढच्या दिवशी दुपारी 14.15 वाजता छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनस येथे थांबेल.

01303/01304 सोलापूर-गुवाहाटी-सोलापूर विशेष ट्रेन:

गाडी क्रमांक 01303 सोलापूर-गुवाहाटी स्पेशल 19 आणि 26 एप्रिलला सोलापूरहून 17.30 वाजता सुटेल. दादर, पुणे, कल्याण इत्यादी स्थानकांवर थांबून दुसऱ्या दिवशी 02.15 पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शन, 03.10 वाजता बक्सर, 05.30 वाजता पाटलीपुत्र, 08.05 वाजता बरौनी, 11.55 वाजता कटिहार स्थानकावर थांबून गुवाहाटीला पोहोचेल. परतीची 01304 गुवाहाटी-सोलापूर स्पेशल ट्रेन 16, 23 आणि 30 एप्रिलला 05.30 वाजता सुटेल, त्यानंतर 17.30 वाजता बरौनी, 20.05 पाटलीपुत्र, पातालीपुत्र, 21.15 वाजता बक्सर, 00.05 वाजता पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शनवर थांबून रविवारी 07.55 वाजता सोलापूर येथे पोहोचेल.

01427/01428 पुणे-भागलपूर-पुणे विशेष ट्रेन:

01427 पुणे-भागलपूर ही स्पेशल ट्रेन 16 आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 06.10 वाजता सुटून मनमाड, इटारसी, जबलपूर इत्यादी स्थानकांवर थांबेल, दुसर्‍या दिवशी सकाळी 07.55 वाजता पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शन, सकाळी 11.35 वाजता पाटणा, दुपारी 12.55 वाजता पूर नंतर भागलपूरला पोहोचेल. परतीची ट्रेन भागलपूर-पुणे भागलपूरहून 17 आणि 21 एप्रिल रोजी सुरू होईल.

01429/01430 पुणे-दानापूर-पुणे विशेष ट्रेन:

01429 पुणे-दानापूर स्पेशल ट्रेन ही गाडी 16 आणि 20 एप्रिल रोजी रात्री 21.30 वाजता पुण्याहून सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी 01.00 वाजता पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शन, 02.28 वाजता बक्सर, 03.13 वाजता आरा आणि 04.40 वाजता दानापूरला पोहोचेल. परतीची 01430 दानापुर-पुणे ट्रेन 18 एप्रिल आणि 22 एप्रिलला सकाळी सात वाजता सुटणार आहे.

09005/09006 वांद्रे टर्मिनस-बरौनी-वांद्रे टर्मिनस विशेष

09005 वांद्रे टर्मिनस-बरौनी विशेष 16, 23, 30 एप्रिल आणि 07, 14, 21 आणि 28 मे रोजी चालविली जाणार आहे. ही विशेष ट्रेन वांद्रे टर्मिनसहून प्रत्येक शुक्रवार 16.04.2021 ते 28.05.2021 दरम्यान 15.45 वाजता सुटेल व रविवारी 13.20 वाजता बरौनीला पोहोचेल. परतीची 09006 बरौनी-बांद्रा टर्मिनस स्पेशल ट्रेन 19, 26 एप्रिल तथा 03, 10, 17, 24 आणि 31 मे रोजी चालवली जाणार आहे. ही विशेष ट्रेन 19 एप्रिल ते 31 मे दरम्यान दर सोमवारी बरौनीहून 00.30 वाजता सुटेल व मंगळवारी वांद्रे टर्मिनस येथे 17.25 वाजता पोहोचेल.

09097/09098 वांद्रे टर्मिनस-बरौनी-वांद्रे टर्मिनस विशेष:

09097 वांद्रे टर्मिनस-बरौनी स्पेशल दर 10.04.2021 ते 29.05.2021 शनिवारी म्हणजेच 17, 24 एप्रिल आणि 01, 08, 15, 22 आणि 29 मे रोजी चालविले जाईल.

या गाड्यांचा विस्तारित कालावधी

>>01097 लोकमान्य टिळक टर्मिनस – दरभंगा साप्ताहिक विशेष ट्रेनचा ऑपरेटिंग कालावधी 26 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
>>01098 दरभंगा-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वे ऑपरेशन कालावधी 27 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
>>01401 पुणे-दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन 30 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
>>01402 दानापूर-पुणे द्वि-साप्ताहिक स्पेशल ट्रेन 02 मे 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
>>01091 छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनल-दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेनचा प्रसार कालावधी 29 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
>>01092 दानापूर-छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनलचे द्वितीय-साप्ताहिक विशेष ट्रेनसाठी 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
>>रेल्वेनेही विल्लुपुरम ते खडगपूर दरम्यान 06178/06177 विशेष रेल्वेची घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या

2 महिन्यात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेन्शनचं टेन्शन वाढणार?, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात ?

Gold Price Today: लग्नाच्या हंगामातच स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Railways Special Trains List: Special Trains for other states people from Mumbai, Pune