देशात लवकरच 8 नव्या बँका, RBI कडे अर्ज, व्यवहारासाठी तुमच्याकडे आता मोठे पर्याय उपलब्ध

देशात लवकरच 8 नव्या बँका सुरु होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) पात्रता पूर्ण करणारी 8 निवेदने आली आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:49 PM, 16 Apr 2021
देशात लवकरच 8 नव्या बँका, RBI कडे अर्ज, व्यवहारासाठी तुमच्याकडे आता मोठे पर्याय उपलब्ध
rbi

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) पात्रता पूर्ण करणारी 8 निवेदने आली आहेत. त्यानुसार सर्वप्रकारच्या सेवा देणाऱ्या युनिव्हर्सल बँक अर्थात सार्वत्रिक सेवा देणाऱ्या बँक स्थापन करणारे 4 आणि लघु अर्थपुरवठा करणाऱ्या म्हणजेच स्मॉल फायनान्स बँकेसाठी (SFB) चार निवेदनांचा समावेश आहे. यूएई एक्स्चेंज अँड फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड (UAE Exchange & Financial Services), द रिपॅट्रिएट्स को ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेवलपमेंट बँक लि. (REPCO Bank), चैतन्य इंडियन फिन क्रेडिट प्रायव्हेट लि (Chaitanya India Fin Credit ) आणि पंकज वैश्य (Pankaj Vaish) यांनी युनिव्हर्सल बँक लायसन्ससाठी अर्ज केले आहेत.

फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांनी सप्टेंबर 2019 मध्ये चैतन्य प्रा. लिमिटेडमध्ये 739 कोटी रुपये गुंतवून बहुसंख्य शेअर्स खरेदी केले होते. सचिन बंसल हे चैतन्य इंडियन फिन क्रेडिट प्रायव्हेट लि. चे मुख्य संचालक आणि CEO आहेत.

लघु अर्थपुरवठा बँकेसाठी अर्ज

लघु अर्थपुरवठा बँकेसाठी चार अर्ज आले आहेत. यामध्ये वीसॉफ्ट टेक्नोलॉजी प्रायव्हेट लि (VSoft Technologies), कालीकट सिटी सर्विस कोऑपरेटिव बँक लि. (Calicut City Service Cooperative Bank), अखिल कुमार गुप्ता (Akhil Kumar Gupta) आणि द्वारा क्षेत्रीय ग्रामीण फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायवेट लि. (Dvara Kshetriya Gramin Financial Services) यांचा समावेश आहे.

युनिव्हर्सल बँकेसाठी निकष

नियमावलीनुसार, युनिव्हर्सल बँकेसाठी किमान 500 कोटींचं भांडवल हवं. म्हणजे तुम्हाला जर सार्वत्रिक सेवा देणारी बँक सुरु करायची असेल तर तुमच्याकडे किमान 500 कोटींचं भांडवल असावं.

दुसरीकडे लघु अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांसाठी हीच मर्यादा 200 कोटी रुपये भांडवलाची आहे. जर एखादी नागरी सहकारी बँक स्वेच्छेने स्मॉल फायनान्स बँकेमध्ये (SFB) रुपांतरीत होणार असेल तर त्यासाठी 100 कोटी भांडवलाची अट आहे. मात्र 5 वर्षात त्यांना 200 कोटी भांडवलं दाखवावं लागेल.

संबंधित बातम्या 

Gold Rate Today | सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर…   

मोठी बातमी! सिटी बँक भारतातून आपला व्यवसाय गुंडाळणार, जाणून घ्या ‘कारण’