मोठी बातमी! HDFC बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही, RBIचे निर्बंध

डेटा सेंटरवरील कामकाजाच्या परिणामामुळे केंद्रीय बँकेने (RBI) हा आदेश दिला. RBI asks Hdfc Bank To Halt Fresh Digital Initiatives

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:44 PM, 3 Dec 2020
आतापर्यंतच शासकीय कामकाजाची वेळ ही 10 ते 5 होती. मात्र आता बँका सकाळी 10 ऐवजी 9 वाजता उघडणार आहेत. त्यामुळे तुम्ही ऑफिसला जाण्यापूर्वी बँकांशी निगडीत काम पूर्ण करु शकता.

नवी दिल्लीः खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँके (HDFC bank) च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आदेशानुसार एचडीएफसी बँकेने आपले आगामी डिजिटल व्यवसाय उपक्रम आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे तात्पुरते थांबवले आहे. गेल्या महिन्यात एचडीएफसीच्या डेटा सेंटरवरील कामकाजाच्या परिणामामुळे केंद्रीय बँकेने (RBI) हा आदेश दिला. (RBI asks Hdfc Bank To Halt Fresh Digital Initiatives)

एचडीएफसीने शेअर बाजारात सांगितले की, मागील दोन वर्षांतील बँकेच्या इंटरनेट बँकिंग/मोबाइल बँकिंग/पेमेंट बँकिंगमधील अडचणींसंदर्भात आरबीआयने एचडीएफसी बँक लिमिटेडला 2 डिसेंबर 2020 रोजी एक आदेश जारी केला. नुकत्याच 21 नोव्हेंबरला झालेल्या प्राथमिक डेटा सेंटरमधील वीज बंद झाल्यामुळे बँकेची इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टम बंद पडली होती, त्याचाही आदेशामध्ये उल्लेख आहे.

डिजिटल 2.0 रोखलं

एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, आरबीआयने आपल्या डिजिटल 2.0 आणि इतर प्रस्तावित आयटी अनुप्रयोगांच्या अंतर्गत नवीन डिजिटल विकास योजना आणि नवीन क्रेडिट कार्डच्या सोर्सिंगला थांबविण्याचा सल्ला बँकेला दिला आहे. एचडीएफसी बँक म्हणाली की, यासह बँकेच्या संचालक मंडळाला याची चौकशी करून उत्तरदायित्व निश्चित करण्यास सांगितले. rbi asks hdfc bank to halt fresh digital initiatives

एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत त्यांनी आयटी प्रणाली मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असून, उर्वरित काम जलद गतीने पूर्ण केले जाईल. डिजिटल बँकिंग व्यवस्थेत अलीकडील समस्या सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे बँकेने म्हटले आहे. नवीन नियामक निर्णयाचा सध्या अस्तित्वात असलेल्या क्रेडिट कार्ड, डिजिटल बँकिंग व्यवस्था आणि विद्यमान कामांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या उपाययोजनांमुळे त्याच्या एकूण व्यवसायावर परिणाम होणार नाही, असा बँकेचा विश्वास आहे.

rbi asks hdfc bank to halt fresh digital initiatives

संबंधित बातम्या

आता HDFC बँकेतून होणार मुंबई पोलिसांचे पगार, 1 कोटींपर्यंत आहे विमा कवच

जीएसटी भरपाईचा 16 राज्यांना मिळाला पहिला हप्ता, केंद्राकडून 6000 कोटी रुपये जारी