दोन हजारांच्या नोटांचा तुटवडा का? आरबीआयच्या अहवालात स्पष्ट

रिझर्व्ह बँकेकडून 2019-20 या आर्थिक वर्षात एकही 2 हजार रुपयांची नोट छापण्यात आलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे (RBI did not print a single note of rs 2000 also decrease in circulation in year 2019-20).

दोन हजारांच्या नोटांचा तुटवडा का? आरबीआयच्या अहवालात स्पष्ट

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 2019-20 च्या वार्षिक अहवालात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेकडून 2019-20 या आर्थिक वर्षात एकही 2 हजार रुपयांची नोट छापण्यात आलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. दोन हजाराच्या नोटा छपाईबाबत कोणताही आदेश न आल्यामुळे वर्षभरात एकही नोट छापण्यात आली नाही, असं कारण सांगण्यात आलं आहे (RBI did not print a single note of rs 2000 also decrease in circulation in year 2019-20).

आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान 2 हजाराच्या नोटांचा तुटवडा जाणवला. हा तुटवडा जवळपास 22 टक्के इतका होता, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेने आज (25 ऑगस्ट) हा अहवाल जारी केला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जानेवारी 2019 मध्येच 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे 2 हजारांच्या नोटा बंद होणार, अशा अफवा अनेकवेळा पसरल्या. मात्र, केंद्र सरकारकडून 2 हजारांच्या नोटा बंद होणार नाही, असं वेळोवेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरवर्षी दोन हजाराच्या नोटांमध्ये घट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, मार्च 2018 साली चलनातील 2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या 33 हजार 632 लाख इतकी होती. तर मार्च 2019 साली 2 हजाराच्या नोटांची संख्या 32 हजार 910 लाख इतकी होती. मार्च 2020 पर्यंत चलनातील 2 हजाराच्या नोटांची संख्या 27 हजार 398 इतकी होती.

दरम्यान, देशात दोन हजारच्या नोटांची संख्या चलनातून कमी होत असताना 2018 सालापासून 500 आणि 200 रुपयांच्या नोटांची संख्या वाढली आहे (RBI did not print a single note of rs 2000 also decrease in circulation in year 2019-20).

‘हिंदुस्तान टाइम्स’ला एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 2016 साली 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर त्यांच्या जागेवर 2 हजाराच्या नोटा छापण्यात आल्या. ही त्यावेळची गरज होती. त्यानंतर हळूहळू कमी किमतीच्या नोटांची चलनात वाढ करण्यात आली. यामध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. याशिवाय देशात डिजीटल देवाणघेवाण वाढली. त्यामुळे आता 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा छापण्याची फारसी गरज नाही.

हेही वाचा : अनैसर्गिक युतीची सत्ता जास्त टिकत नाही, अधिवेशनापूर्वी फडणवीसांचा हल्लाबोल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *