सहकारी बँकांच्या संचालकपदासाठी RBI कडून अर्थशास्त्रातील पदवी बंधनकारक, पण गव्हर्नरच इतिहासाचे पदवीधारक

RBI | एकीकडे या निर्णयाचे स्वागत केले जात असले तरी RBI च्या नियमावलीवरुन एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सहकारी बँकांच्या संचालकपदावरील व्यक्ती 'अर्थसाक्षर' असणे गरजेचे आहे.

सहकारी बँकांच्या संचालकपदासाठी RBI कडून अर्थशास्त्रातील पदवी बंधनकारक, पण गव्हर्नरच इतिहासाचे पदवीधारक
शक्तिकांत दास, आरबीआय गव्हर्नर
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 1:07 PM

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी आणि नागरी बँकांसाठी नुकताच एक नवा नियम लागू केला होता. त्यानुसार आता आमदार, खासदार आणि नगरसेवकांना नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक होण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सहकारी आणि नागरी बँकांतील घोटाळ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे. एकीकडे या निर्णयाचे स्वागत केले जात असले तरी RBI च्या नियमावलीवरुन एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. (RBI prescribes qualifications for MDs, Whole-Time Directors of urban cooperative banks)

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सहकारी बँकांच्या संचालकपदावरील व्यक्ती ‘अर्थसाक्षर’ असणे गरजेचे आहे. याचा अर्थ नागरी सहकारी बँकांवरील व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालकपदावरील व्यक्तीकडे स्नातकोत्तर पदवीधारक (Postgraduate), वित्तीय विषयातील, सनदी वा व्यय लेखापाल (​कॉस्ट अकाऊंटट) किंवा आर्थिक विषयातील व्यवस्थापन पदवीधारक, बँक अथवा सहकारी व्यवसाय व्यवस्थापनातील पदविकाधारक असावी, असा दंडक घालून देण्यात आला आहे. मात्र, हाच धागा पकडत अनेकांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या शिक्षणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी शक्तिकांत दास यांच्या शिक्षणाचा दाखला देत RBI च्या धोरणातील विसंगतीवर बोट ठेवले आहे. शक्तिकांत दास यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून इतिहासात एम.ए. केले आहे. त्यानंतर दास हे परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी (IAS) झाले होते. आजपर्यंतच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली असली तरी अनेकजण त्यांच्याकडे अर्थशास्त्राचे कोणतेही शिक्षण नसल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधू पाहत आहेत.

यापूर्वीही झाली होती टीका

उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली होती. आजवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद डी.सुब्बाराव, रघुराम राजन. डॉ. मनमोहन सिंग, अशा अनेक विख्यात अर्थतज्ज्ञांनी भुषविले आहे. त्यामुळे इतिहासाची पदवी असलेल्या शक्तिकांत दास यांना नियुक्तीच्यावेळीही ट्रोल करण्यात आले होते.

प्रशासकीय सेवा बजावताना अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले?

या टीकेनंतर अनेकजण शक्तिकांत दास यांच्या बचावासाठी पुढे सरसावेल आहेत. विकीपिडीयावर शक्तिकांत दास यांनी इतिहासात एम.ए. केल्याचे दाखवत असले तरी नंतरच्या काळात त्यांनी अर्थशास्त्राचे औपचारिक शिक्षण पूर्ण केल्याचे अनेकजण सांगत आहेत. प्रशासकीय सेवा बजावत असतानाच आयआयएम बंगळुरू मधून प्रगत आर्थिक व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तसेच, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट (एनआयबीएम) मधून डेव्हलपमेंट बँकिंग आणि संस्थात्मक पत हा कोर्स पूर्ण केला आहे. याशिवाय त्यांनी आर्थिक व्यवस्थापना संदर्भातील काही कोर्सेस देखील पूर्ण केले आहेत.

संबंधित बातम्या:

रिझर्व्ह बँकेचा राजकारण्यांना झटका; नागरी बँकांच्या संचालकपदावर नगरसेवक, आमदार, खासदारांना मज्जाव

(RBI prescribes qualifications for MDs, Whole-Time Directors of urban cooperative banks)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.