‘या’ बँकेचा कोरोना संकटात ग्राहकांना दिलासा; व्याजदर घटवले, आता EMI किती?

ओव्हरनाईट, एक महिना, तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षाच्या व्याजदरामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. RBL bank

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:22 PM, 22 Apr 2021
'या' बँकेचा कोरोना संकटात ग्राहकांना दिलासा; व्याजदर घटवले, आता EMI किती?
kyc updation 31 december 2021

नवी दिल्ली: खासगी क्षेत्रातील आरबीएल बँकेने (RBL Bank) देशभर वेगाने पसरलेल्या कोरोना संकटात ग्राहकांना दिलासा दिलाय. बँकेने एप्रिलमध्ये MCLR दर कमी केलेत, याचा अर्थ आता तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी ईएमआय द्यावा लागणार आहे. बँकेचे नवीन व्याजदर आज 22 एप्रिल 2021 पासून लागू झालेत. ही कपात सर्व कालावधीच्या व्याजदरासाठी दिली गेलीय. ओव्हरनाईट, एक महिना, तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षाच्या व्याजदरामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. (RBL bank Corona Crisis Relieves Customers; Reduced interest rates, what is the EMI now?)

बँकेच्या ग्राहकांचा EMI 0.35 टक्क्यांपर्यंत कमी होणार

CNBC TV18 च्या वृत्तानुसार, RBL च्या या निर्णयानंतर बँकेच्या ग्राहकांचा EMI 0.35 टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकतो. मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे याची माहिती मिळू शकते.

22 एप्रिल 2021 पासून बँकेने नवीन दर लागू केले

> ओव्हरनाईट – 7.65 टक्के
>> एक महिना – 7.75 टक्के
>> तीन महिने – 7.85 टक्के
>> सहा महिने – 8.05 टक्के
>> एक वर्ष – 8.40 टक्के

मार्च महिन्यात MCLR Rates किती होते-

> ओव्हरनाईट – 8 टक्के
>> एक महिना – 8 टक्के
>> तीन महिने – 8.10 टक्के
>> सहा महिने – 8.35 टक्के
>> एक वर्ष – 8.65 टक्के

अधिकृत लिंक –

अधिक माहितीसाठी आपण या लिंकवर भेट देऊ शकता https://drws17a9qx558.cloudfront.net/docament/mclr-base-rate-plr/mclr-rates-april-22-2021.pdf.

या बँकेमध्ये सर्वात कमी व्याजदर

कोटक महिंद्रा बँक दावा करीत आहे की, यावेळी ते सर्वात कमी व्याजदरावर कर्ज देत आहेत. बँक ग्राहकांना 6.65 टक्के दराने गृहकर्ज देते. कोटक महिंद्रा बँकेच्या मते, विशेष ऑफरनुसार 31 मार्चपर्यंत 6.65% व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. जे आता बँकेने पुढे ढकलले. RBL bank Corona Crisis Relieves Customers; Reduced interest rates, what is the EMI now?

संबंधित बातम्या

जगातील पहिलं क्यूआर कोडचं क्रेडिट कार्ड भारतात लाँच; जाणून घ्या सर्व काही

सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर हे 3 पर्याय येतील कामी; दुप्पट फायदा मिळणार

RBL bank Corona Crisis Relieves Customers; Reduced interest rates, what is the EMI now?