बांधकाम क्षेत्राला ‘अच्छे दिन’, नवरात्रीच्या काळात मुंबईत घरांच्या विक्रीत वाढ

Real Estate | कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एकही घरविक्री झाली नाही. मे महिन्यात फक्त 207 घरे विकली गेली. जून ते सप्टेंबपर्यंत हळूहळू घरविक्रीचा वेग वाढत होता. राज्य शासनाने मुद्रांक शुल्कांत मार्च 2021 पर्यंत सूट दिल्यानंतर घरविक्री वधारली. प्रथमच ऑक्टोबर महिन्यात नवरात्रीच्या सात दिवसांत घरविक्री प्रतिदिन 350 इतकी झाली आहे.

बांधकाम क्षेत्राला 'अच्छे दिन', नवरात्रीच्या काळात मुंबईत घरांच्या विक्रीत वाढ
घरबांधणी क्षेत्र
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 8:16 AM

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बांधकाम उद्योगासाठी ही दिलासादायक घटना आहे. ऑक्टोबर महिन्यात 13 तारखेपर्यंत मुंबईत एकूण घरांची विक्री 3341 इतकी झाली असून त्यापैकी 2494 इतकी घरे 7 ते 13 ऑक्टोबर या नवरात्रीच्या पहिल्या सात दिवसांत विकली गेली आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एकही घरविक्री झाली नाही. मे महिन्यात फक्त 207 घरे विकली गेली. जून ते सप्टेंबपर्यंत हळूहळू घरविक्रीचा वेग वाढत होता. राज्य शासनाने मुद्रांक शुल्कांत मार्च 2021 पर्यंत सूट दिल्यानंतर घरविक्री वधारली. प्रथमच ऑक्टोबर महिन्यात नवरात्रीच्या सात दिवसांत घरविक्री प्रतिदिन 350 इतकी झाली आहे.

‘कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागल्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी’

कोरोना संकटामुळे गर्तेत फसलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला आता पुन्हा एकदा सुगीचे दिवस येण्याचे संकेत मिळत आहेत. कारण नुकत्याच सरलेल्या जून तिमाहीत मालमत्तांच्या विक्रीचे प्रमाण दुप्पट झाल्याची माहिती समोर आली आहे. देशातील आठ प्रमुख शहारांमध्ये नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत 6.85 कोटी वर्ग फूट इतक्या घरांची विक्री झाली. मे महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जून तिमाहीत गेल्यावर्षीच्या तुलनेत घर विक्रीचे प्रमाण कमी असले तरी ते दिलासादायक असल्याचे सांगितले जाते.

गृहकर्जाचा व्याजदर निच्चांकी पातळीवर

ICAR च्या माहितीनुसार, गृहकर्जाचा व्याजदर हा गेल्या काही वर्षांतील निच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे अनेकजण घरखरेदीसाठी उत्सुकता दाखवत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत दैनंदिन व्यवहार कमी प्रमाणात ठप्प झाले होते. त्यामुळे मोजके व्यवहार वगळता इतर गोष्टी सुरु राहिल्या. याचा फायदा रिअल इस्टेट क्षेत्राला झाला.

आयटी क्षेत्राकडून मागणी

कोरोनाकाळात बहुतांश क्षेत्रांना फटका बसला असला तरी आयटी क्षेत्राला सुगीचे दिवस आले होते. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली. या सगळ्याचा फायदा घरबांधणी क्षेत्रालाही झाला आहे.

मुंबईत मे महिन्यात 11 हजार कोटींची मालमत्ता विक्री

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असताना आणि अर्थव्यवस्था आक्रसलेली असताना मुंबईत मात्र नव्या मालमत्तांची खरेदी जोरात सुरु असल्याचे दिसून आले होते. कारण, मे महिन्यात मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात (MMRA) तब्बल 11 हजार कोटींची मालमत्ता विक्री व्यवहार झाल्याचे समोर आले होते.

30 मे 2021 रोजी सीआरई मॅट्रिक्स प्रॉपर्टी ट्रॅकर आणि आयजीआर महाराष्ट्र कडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मे 2021 मध्ये मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद रु. 10979 कोटी इतकी तर एप्रिल 2021 मध्ये रु. 22,507 कोटी इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये एमएमआर मध्ये नोंदणीकृत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे रू. 44167 कोटी, रु. 21696 कोटी आणि रु. 21484 कोटी इतके झाले.

30 मे 2021 पर्यंत मुंबईत मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद मे 2021 मध्ये रु. 7246 कोटी तर एप्रिल 2021 मध्ये रु. 16250 कोटी इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये मुंबईत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे रु. 28961 कोटी, रु. 12989 कोटी आणि रु. 12890 कोटी इतके झाले.

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा रिअल इस्टेट मार्केटला फटका, घरांच्या विक्रीत 23 टक्क्यांनी घट

भारतात सर्वात महाग आणि स्वस्त घरं कोणत्या शहरात?

लॉकडाऊन काळात कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाठ वाढ, बांधकाम क्षेत्राला जबर फटका

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.