राज्यांना दररोज 700 टन ऑक्सिजन पुरवठा करतेय रिलायन्स; 70 हजार रुग्णांचे वाचणार प्राण

गुजरातमधील कंपनीच्या जामनगर रिफायनरीने सुरुवातीला 100 टन वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनचे उत्पादन केले, जे आता त्वरित 700 टन करण्यात आले. Reliance oxygen supplies patients

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Publish Date - 12:20 am, Wed, 21 April 21

Reliance oxygen supplies patients

नवी दिल्ली : अब्जाधीश मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (reliance industries mukesh ambani)आपल्या जामनगर ऑईल रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन तयार करत आहे. कोरोनात दुष्काळग्रस्त राज्यांना हे ऑक्सिजन विनाशुल्क दिले जात आहे. कोरोनामुळे देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर लक्षात घेता रिलायन्सने अधिक ऑक्सिजन तयार करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी रिलायन्सलाही आपल्या उत्पादन पद्धती बदलण्याची गरज होती. गुजरातमधील कंपनीच्या जामनगर रिफायनरीने सुरुवातीला 100 टन वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनचे उत्पादन केले, जे आता त्वरित 700 टन करण्यात आले. (Reliance supplies 700 tonnes of oxygen to states daily; 70,000 patients will be saved)

वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवून 1000 टन करण्याची योजना

कोरोना संक्रमणाने ग्रस्त असलेल्या गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात पुरविल्या जाणाऱ्या पुरवठ्यामुळे दररोज 70,000 हून अधिक गंभीर रुग्णांना दिलासा मिळणार आहे. लवकरच कंपनीची वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवून 1000 टन करण्याची योजना आहे.

कोरोनो व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे ऑक्सिजनची मागणी वाढलीय

रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीमध्ये कच्चे तेल डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधनासारख्या उत्पादनांची निर्मिती करते, जिथे मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन तयार होत नाही. परंतु कोरोनो व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे ऑक्सिजनची मागणी वाढलीय. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता रिलायन्सने वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनची निर्मिती करण्यास सक्षम असलेली यंत्रणा बसविली. मेडिकल ग्रेड ऑक्सिजन तयार करण्यासाठी औद्योगिक ऑक्सिजन तयार करण्याच्या सुविधांचा उपयोग केला जात आहे.

भारतातील राज्यांमध्ये दररोज सुमारे 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा

“भारतातील राज्यांमध्ये दररोज सुमारे 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यामुळे दररोज 70,000 हून अधिक गंभीर आजार झालेल्या रुग्णांना दिलासा मिळेल. विशेष म्हणजे टँकरमध्ये मायनस 183 डिग्री सेल्सियसमध्ये ऑक्सिजन ठेवला जातो. परिवहन खर्चासह राज्य सरकारांना विनाशुल्क ऑक्सिजन दिले जात आहे. हा कंपनीच्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग आहे.

कोरोनाशी लढताना रिलायन्सच्या कामाची यादी खूपच लांब

कोरोनाशी लढताना रिलायन्सच्या कामाची यादी खूपच लांब आहे. रिलायन्स फाऊंडेशनने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सहकार्याने मुंबईत देशातील पहिले कोविड हॉस्पिटल सुरू केले. 100 बेडचे हे हॉस्पिटल केवळ दोन आठवड्यांत स्थापित केले गेले, लवकरच ते 250 खाटांवर वाढविण्यात आले. रिलायन्सने महाराष्ट्रातील लोधीवाली येथे पूर्णपणे सुसज्ज विलगीकरण सुविधा तयार केली आणि ती जिल्हा अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली.

आरोग्य आणि अग्रभागी कामगारांसाठी दररोज 1,00,000 पीपीई आणि फेस मास्क तयार

रिलायन्स भारतातील आरोग्य आणि अग्रभागी कामगारांसाठी दररोज 1,00,000 पीपीई आणि फेस मास्क तयार करते. गेल्या वर्षी देशभरात लॉकडाऊनदरम्यान आपत्कालीन सेवा अखंडित चालू ठेवण्यासाठी रिलायन्सने 18 राज्यांतील 249 जिल्ह्यांमधील 14,000 रुग्णवाहिकांमध्ये 5.5 लाख लिटर मोफत इंधन उपलब्ध करून दिले. लॉकडाऊनदरम्यान रिलायन्स फाऊंडेशनने मिशन अन्न सेवा ही जगातील कोठेही कॉर्पोरेटद्वारे सुरू केलेला सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम सुरू केला. मिशन अन्न सेवा अंतर्गत 18 राज्यांतील 80 जिल्ह्यांमध्ये 5.5 कोटींहून अधिक जेवण दिले गेले.

संबंधित बातम्या

कोरोनात ऑक्सिजन सिलिंडरचा व्यवसाय करा, जाणून घ्या, कमाईपासून सुरू करण्याची प्रक्रिया

SBI मध्ये जनधन खाते असल्यास बँकेकडून मिळतेय 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या…

Reliance supplies 700 tonnes of oxygen to states daily; 70,000 patients will be saved

Ads By Adgebra

मयुर शेळके याने वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या अंध महिलेच्या मुलाचा जीव वाचवला होता. (Mayur Shelke donate money to blind lady)