प्रवासी मजुरांमुळे हळूहळू अर्थव्यवस्थाही रुळावर, घरी पैसे पाठवण्याचं प्रमाण वाढलं

अहवालानुसार कोरोना काळात जनधन खात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यांची संख्या आता 41 कोटींच्या पुढे गेली आहे.

प्रवासी मजुरांमुळे हळूहळू अर्थव्यवस्थाही रुळावर, घरी पैसे पाठवण्याचं प्रमाण वाढलं

नवी दिल्लीः देशाच्या अर्थव्यवस्थेत (Indian Economy) मोठी सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. एसबीआय रिसर्चच्या रिपोर्टनुसार, सप्टेंबरमध्ये प्रवासी मजूर घरी पाठवत असलेल्या पैशांमध्ये वाढ झाली आहे आणि ती फेब्रुवारीतील पातळीच्याही वर गेली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) नव्या नोंदणीची संख्याही वाढली आहे. अहवालानुसार कोरोना काळात जनधन खात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यांची संख्या आता 41 कोटींच्या पुढे गेली आहे. (economy slowly getting back on track due to migrant workers)

परप्रांतीय मजुरांनी त्यांच्या घरी पाठवलेली रक्कम एप्रिलमधील लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणात खाली गेली होती. त्यात जून आणि जुलैमध्ये सुधारणा दिसून आली. तर सप्टेंबरचे आकडे कोरोना संकटापूर्वी (corona virus) फेब्रुवारीच्या पातळीवर पोहोचले आहेत. यावरून असे दिसून आले आहे की परप्रांतीय मजूर रोजगारासाठी कामावर मोठ्या प्रमाणात परतले आहेत. परंतु ऑगस्टमध्ये बर्‍याच भागात मुसळधार पावसामुळे कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मजुरांच्या घरी पैसे पाठविण्यास घट झाली.

एसबीआय रिसर्चच्या रिपोर्टनुसार स्थलांतरित मजुरांना पैसे पाठविण्याचा निर्देशांक फेब्रुवारीमध्ये 112 अंक एवढा होता, जो साधारणत: 100 च्या आसपास असतो. त्याच वेळी एप्रिलमध्ये तो 85 अंकांवर घसरला आहे. पण मे मध्ये त्यात सुधारणा झाली. मेमध्ये 94, जूनमध्ये 105, जुलैमध्ये 103 आणि ऑगस्टमध्ये 97 अंकांवर होता. तर सप्टेंबरमध्ये तो पुन्हा 115 च्या वर पोहोचला. त्याचप्रमाणे एप्रिल ते ऑगस्ट 2020 च्या ईपीएफओच्या वेतनपट आकडेवारीनुसार त्यात 25 लाख नवीन नोंदणी झाली. यापैकी 12.4 लाखांची नोंद सर्वप्रथम नोंदविण्यात आली.

या व्यतिरिक्त 14 ऑक्टोबरपर्यंत जन धन खात्यांची एकूण संख्या 41.05 कोटी आहे. त्याच वेळी यामध्ये एकूण थकबाकी 1.31 लाख कोटी रुपये आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच सुमारे तीन कोटी नवीन जन धन खाती उघडली गेली आहेत, तर एकूण ठेवींमध्ये 11,060 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

रेल्वेमध्ये भरतीची सुवर्णसंधी, फक्त एक मुलाखत आणि मिळणार 2 लाखांपर्यंत पगार

आता मिळणार कॅशबॅक! ग्राहकांना तात्काळ व्याज परत द्या, RBI चा बँकांना आदेश

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *