'रेनेगेड कमांडो क्लासिक'ची बाईक भारतात लाँच, किंमत तब्बल...

मुंबई : UM मोटरसायकल कंपनीने रेनेगेड कमांडो क्लासिक(Renegade Commando Classic) कार्ब्युरेटर व्हेरियंट बाईकला भारतात लाँच केलं आहे.  UM पहिल्यापासून रेनेगेड कमांडो क्लासिक फ्यूल इंजेक्टेड व्हेरियंट ही बाईक भारतात खरेदीसाठी उपलब्ध होती. या बाईकची किंमत 2 लाख रुपये इतकी होती. मात्र, आता लाँच केलेल्या कार्ब्युरेटर व्हेरियंट या बाईकची किंमत 1 लाख 95 हजार रुपये इतकी असणार …

Renegade Commando Classic bike Launch, ‘रेनेगेड कमांडो क्लासिक’ची बाईक भारतात लाँच, किंमत तब्बल…

मुंबई : UM मोटरसायकल कंपनीने रेनेगेड कमांडो क्लासिक(Renegade Commando Classic) कार्ब्युरेटर व्हेरियंट बाईकला भारतात लाँच केलं आहे.  UM पहिल्यापासून रेनेगेड कमांडो क्लासिक फ्यूल इंजेक्टेड व्हेरियंट ही बाईक भारतात खरेदीसाठी उपलब्ध होती. या बाईकची किंमत 2 लाख रुपये इतकी होती. मात्र, आता लाँच केलेल्या कार्ब्युरेटर व्हेरियंट या बाईकची किंमत 1 लाख 95 हजार रुपये इतकी असणार आहे. रेनेगेड कमांडो क्लासिक फ्यूल इंजेक्टेड व्हेरियंट या जुन्या बाईकला मॉडिफाय करत ही नवीन बाईक तयार करण्यात आली आहे. तसेच ही नवीन बाईक खरेदी करण्यासाठी 5 हजार रुपये कमी मोजावे लागणार आहेत.

रेनेगेड कमांडो क्लासिक कार्ब्युरेटर व्हेरियंट बाईक खरेदी करण्यासाठी कंपनीने ABS अट मागे घेतली आहे. त्यामुळे रेनेगेड कमांडो क्लासिक कार्ब्युरेटर व्हेरियंट ही बाईक रेनेगेड कमांडो क्लासिक फ्यूल इंजेक्टेड व्हेरियंट या बाईकपेक्षा कमी ऊर्जा खर्च करेल.

Fi अर्थात रेनेगेड कमांडो क्लासिक फ्यूल इंजेक्टेड व्हेरियंट बाईक आणि नवीन व्हेरियंट बाईक या दोघांमध्ये 279.5cc लिक्विड कूल सिंगल सिलेंडर इंजीनचा समावेश करण्यात आला आहे. Fi व्हेरियंट 25.15bhp क्षमतेची ऊर्जा तर 23Nm इतका पिक टॉर्क जनरेट करते. तसेच नवीन कार्ब्युरेटर व्हेरियंट बाईक 23.7bhp क्षमतेमध्ये 23Nm इतका पिक टॉर्क जनरेट करते. विशेष म्हणजे, दोघांमध्ये ही 5 स्पीड गिअर बॉक्सचा समावेश करण्यात आला आहे.

या दोन्ही बाईकमध्ये पुढच्या चाकाला 280mm डिस्क ब्रेक तर मागच्या चाकाला 130mm ड्रम ब्रेकचा समावेश करण्यात आला आहे. तसेच UM रेनेगेड कमांडो क्लासिकमध्ये मस्क्यूलर इंधन टाकी, गोलाकार हेडलाईट, टॉल विंडस्क्रीन आणि बैक रेस्टसाठी स्प्लिट सीट्स देण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *