रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रविवारी ट्विट करत ही माहिती दिली (RBI One Million Twitter followers )
नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) ट्विटर ‘फॉलोअर्स’ची संख्या दिवसागणिक वाढत असून, आता ती संख्या 10 लाखांवर गेली आहे. रिझर्व्ह बँक अशी कामगिरी करणारी जगातील पहिली मध्यवर्ती बँक बनली आहे. मायक्रोब्लॉगिंग साइटवर रिझर्व्ह बँकेने 10 लाख फॉलोअर्ससह अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) आणि युरोपियन सेंट्रल बँकेला (European Central Bank) मागे टाकले आहे. रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध माहितीनुसार, 27 सप्टेंबर 2020 रोजी त्याचे फॉलोअर्स 9.66 लाख होते, ते फॉलोअर्स 10 लाखांवर गेले आहेत. (Reserve Bank Of India Became The Most Followed Bank On Twitter With One Million Followers)
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रविवारी ट्विट करत ही माहिती दिली. ते म्हणाले, “रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर अकाऊंटवर आज फॉलोअर्सची संख्या 10 लाखांवर गेली आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन.”
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंतर 7,74,000 फॉलोअर्ससह दुसर्या क्रमांकावर बँको डी मेक्सिको (बँक ऑफ मेक्सिको) आहे. जगातील सर्वात शक्तिशाली मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे ट्विटरवर फक्त 6.67 लाख फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या फॉलोअर्सची संख्या 5.91 लाख आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक मार्च 2009मध्ये ट्विटरशी कनेक्ट झाली. ईसीबी ऑक्टोबर 2009 पासून ट्विटरशी संबंधित आहे. reserve bank of india became the most followed bank on twitter with one million followers
85 वर्षांच्या रिझर्व्ह बँकेचे ट्विटर अकाऊंट जानेवारी 2012 मध्ये सुरू झाले. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे एक स्वतंत्र ट्विटर हँडल आहे, ज्यावर फॉलोअर्सची संख्या 1.35 लाख आहे. मार्च 2019मध्ये ट्विटरवर आरबीआयच्या फॉलोअर्स संख्या 3,42,000 होती, जी मार्च 2020 मध्ये दुपटीने 7,50,000 झाली.
RBI Twitter account reaches one million followers today. A new milestone. Congratulations to all my colleagues in RBI.
— Shaktikanta Das (@DasShaktikanta) November 22, 2020
एका अधिका-याने सांगितले की, कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी लावलेल्या सात आठवड्यांच्या लॉकडाऊनदरम्यान ट्विटरच्या रिझर्व्ह बँकेच्या फॉलोअर्सची संख्या दीड लाखांहून अधिक वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात अडीच लाख फॉलोअर्स रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हँडलशी जोडले गेले आहेत.
reserve bank of india became the most followed bank on twitter with one million followers
संबंधित बातम्या
सरकारचा मोठा निर्णय! 10 हजार लोकांना नोकर्या मिळणार; भरघोस कमाईची संधी
24 तासांत दोन बँकांवर धडक कारवाई, लक्ष्मी विलासनंतर RBI चे आणखी एका बँकेवर निर्बंध